नागपूर : प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ज्ञ व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. विलास डांगरे यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रविवारी पहाटे शहरातील एका रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांना श्वासोच्छ्वास घेण्यास त्रास होत होता व त्यांचा रक्तदाबदेखील कमी झाला होता. त्यांच्यावर रविवारी दिवसभर उपचार करण्यात आले. दुपारनंतर त्यांच्या प्रकृतीत काही प्रमाणात सुधारणा झाली अशी माहिती उपचार करणाऱ्या डॉ.राजेश अटल यांनी दिली. डॉ.डांगरे अत्यवस्थ असल्याची बातमी कळताच केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शहरातील मान्यवरांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. (प्रतिनिधी)
डॉ. विलास डांगरे अत्यवस्थ
By admin | Published: December 29, 2014 2:37 AM