लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेने शहरातील सर्व नाले व गटारांची सफाई केल्याचा दावा केला असला तरी काही भागातील नाल्यांची अद्याप सफाई झालेली नाही. याशिवाय नाल्यांच्या मेनहोलवरील झाकणे बेपत्ता आहेत. अमरावती रोडवरील भरतनगरमध्ये असेच चित्र असून त्यामुळे प्रसंगी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.भरतनगरातील सौजन्य अपार्टमेंटजवळ मदर डेअरीच्या बाजूला असलेले मेनहोल उघडे आहे. पावसाळ्यात या संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. त्यामुळे या भागातून जाणाऱ्या नागरिकांना व वााहनांना अपघात होण्याचा धोका असतो. स्थानिक नागरिकांनी वारंवार झोन कार्यालयाकडे याबाबत तक्रार केली. मात्र, त्यानंतरही मेनहोलवरील झाकणे लावण्यात आलेली नाहीत. या पावसाळ्यात तरी महापालिकेने दखल घेऊन त्वरित उपाय योजावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.यासोबत शहरातील विविध भागात उघडे असलेल्या मेनहोल बाबत नागरिकांना महापालिकेला कळविता यावे यासाठी आयुक्तांनी एक हेल्पलाईन नंबर जारी करावा. यासोबतच एखाद्या भागात पावसाचे पाणी जमा झाले तर सफाई कर्मचाऱ्यांनी त्वरित याची माहिती महापालिकेला कळवावी, असे निर्देशही आयुक्तांनी द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
भरतनगरातील गटारे उघडी : नागपूर महापालिकेकडून दखल नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 10:58 PM
महापालिकेने शहरातील सर्व नाले व गटारांची सफाई केल्याचा दावा केला असला तरी काही भागातील नाल्यांची अद्याप सफाई झालेली नाही. याशिवाय नाल्यांच्या मेनहोलवरील झाकणे बेपत्ता आहेत. अमरावती रोडवरील भरतनगरमध्ये असेच चित्र असून त्यामुळे प्रसंगी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ठळक मुद्देप्रसंगी घडू शकतो अपघात