शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
3
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
4
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
6
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
7
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
8
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
9
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
10
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
11
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
12
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
13
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
14
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
15
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
16
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
17
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
18
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
19
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
20
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...

‘डिजिटल इंडिया’चे स्वप्न पाहणाऱ्या सरकारातील आमदार कधी होणार ‘टेक्नोसॅव्ही’?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 10:21 AM

या वर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापासून विधान परिषदेत आमदारांना ‘लॅपटॉप’ची सुविधा देण्यात आली. मात्र वर्षाअखेरीस उपराजधानीत होत असलेल्या हिवाळी अधिवेशनापर्यंतदेखील अनेक आमदारांना बहुधा अद्यापही ‘लॅपटॉप’च्या वापराचा सराव झालेला नाही.

ठळक मुद्देविधान परिषदेतील ‘लॅपटॉप’ शोभेपुरतेच ‘पेपरलेस’ कसे होणार सभागृह?

योगेश पांडे ।आॅनलाईन लोकमतनागपूर : ‘सबकुछ आॅनलाईन’च्या युगात विधिमंडळाचे कामकाजदेखील तंत्रज्ञानाधिष्ठित प्रणालीने व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याअंतर्गतच या वर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापासून विधान परिषदेत आमदारांना ‘लॅपटॉप’ची सुविधा देण्यात आली. मात्र वर्षाअखेरीस उपराजधानीत होत असलेल्या हिवाळी अधिवेशनापर्यंतदेखील अनेक आमदारांना बहुधा अद्यापही ‘लॅपटॉप’च्या वापराचा सराव झालेला नाही. म्हणूनच की काय सभागृहात काही अपवाद वगळता इतर सदस्यांकडून ‘लॅपटॉप’चा वापरच होताना दिसून येत नाही. अशा स्थितीत सभागृह ‘पेपरलेस’ कसे होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.विधिमंडळातील कामकाज ‘आॅनलाईन’ व्हावे व कामकाजादरम्यान आमदारांना एका ‘क्लिक’वर हव्या त्या गोष्टीची माहिती घेता यावी, यासाठी विधान परिषदेतील आमदारांना ‘लॅपटॉप’ उपलब्ध करून देण्यात आले. सभागृहात ‘वायफाय’ उपलब्ध असल्यामुळे सहजपणे कुठलाही संदर्भ शोधू शकणे आमदारांना शक्य झाले आहे. नागपूर अधिवेशनातील तर ही पहिलीच वेळ होती. प्रशासनाच्या या सकारात्मक पावलाचे राजकारण्यांकडूनदेखील कौतुक करण्यात आले होते. विशेष म्हणजे अशा प्रकारची सुविधा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले होते.परिषदेत सुमारे ८० ‘हायब्रिड लॅपटॉप’ पुरविण्यात आले असून यांचा उपयोग ‘टच’नेदेखील करणे शक्य आहे. कामकाजाचे वेळापत्रक, प्रश्नांचा क्रम इत्यादी गोष्टी एका ‘क्लिक’वर पाहता येतात. कामकाजाच्या सुरुवातीला प्रत्येक ‘लॅपटॉप’ सुरू करण्यात येतो व त्यात विधिमंडळाच्या संकेतस्थळाचे ‘वेबपेज’ उघडून ठेवण्यात येते. आमदारांसोबतच सभागृहातील अधिकाºयांच्या आसनासमोरदेखील ‘लॅपटॉप’ आहेत.मुंबईत ज्यावेळी ही सुविधा देण्यात आली तेव्हा अनेकांना सराव नसल्यामुळे अडचण गेली. पुढील अधिवेशनांमध्ये याचा नियमित उपयोग होईल, अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात असे घडलेच नाही. विधान परिषदेत सत्ताधारी व विरोधकांच्या बाकांवरील काही सदस्य सोडले तर इतरांच्या बाकासमोरील ‘लॅपटॉप’चा उपयोगच होत नसल्याचे चित्र आहे.

‘स्मार्टफोन’चा होतो वापरतसे पाहिले तर ‘स्मार्टफोन’ आणि ‘लॅपटॉप’च्या कार्यप्रणालीत आता फारसा फरक राहिलेला नाही. सदस्यांचा गोंधळ होऊ नये यासाठी त्यांना विशेष ‘टचस्क्रीन’चे ‘लॅपटॉप’ पुरविण्यात आले आहेत. बहुतांश आमदार ‘स्मार्टफोन’ वापरतात. मात्र ‘लॅपटॉप’चा वापर करण्यासाठी अनेकांनी पुढाकारच घेतलेला नाही.सदस्यांना सराव नाही, वापर होईलयासंदर्भात संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांना विचारणा केली असता त्यांनी ‘लॅपटॉप’चा अनेक सदस्यांकडून वापर होत नसल्याचे मान्य केले. ‘आॅनलाईन’च्या युगात बदल अपेक्षित आहे. सध्या ‘पेपरलेस’चे युग असल्यामुळे हा पुढाकार घेण्यात आला. अनेक सदस्यांना ‘लॅपटॉप’चा अद्यापपर्यंत सराव नाही. मात्र नक्कीच लवकरच त्यांच्याकडूनदेखील याचा नियमित वापर सुरू होईल. काही सदस्य मात्र ‘टेक्नोसॅव्ही’ झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७technologyतंत्रज्ञान