शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

‘प्रॉपर्टी एक्स्पो’त साकारणार घराचे स्वप्न

By admin | Published: March 27, 2017 1:59 AM

ग्रामीण भागातील लोकांना स्वस्त दरात घर उपलब्ध करून देण्याची राज्य शासनाची योजना आहे.

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे : लोकमतच्या तीन दिवसीय उपक्रमाचे थाटात उद््घाटननागपूर : ग्रामीण भागातील लोकांना स्वस्त दरात घर उपलब्ध करून देण्याची राज्य शासनाची योजना आहे. या योजनेला ‘लोकमत’ हातभार लावत असून त्यांचा प्रॉपर्टी एक्स्पो उपक्रम प्रशंसनीय असल्याचे प्रतिपादन राज्याचे ऊर्जा आणि उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे केले. लोकमतचा तीन दिवसीय प्रॉपर्टी एक्स्पो हॉटेल सेंटर पॉर्इंट रामदासपेठ येथे रविवारपासून सुरू झाला. एक्स्पोच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. या वेळी पिरॅमिड सिटीचे प्रदीप तातावार, पुष्कर होमचे कार्तिक अय्यर, पायोनियर समूहाचे अनिल नायर, टेकआॅप इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक विलास हरडे, जीवन घिमे, नरेंद्र डाखळे, अथर्व इन्फ्रास्ट्रक्चरचे नरेंद्र मलेलवार आणि मनोज सुरमवार, महाजेम्सचे संचालक सुधीर पालीवाल, लोकमतचे वरिष्ठ व्यवस्थापक (विपणन) सोलोमन जोसेफ उपस्थित होते. लोकमतचे उपमहाव्यस्थापक (उत्तर महाराष्ट्र, विपणन) आसमान सेठ यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. लोकमतने लोकांना किफायत दरात प्रॉपर्टी उपलब्ध करून देण्यासाठी स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. एक्स्पोच्या माध्यमातून लोकांना थेट बिल्डर्सकडून प्रॉपर्टी खरेदीची करता येईल. बावनकुळे म्हणाले, पारदर्शक व्यवहार करताना बिल्डरने प्रकल्पात ग्राहकांना सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तर दुसरीकडे शासन तुमच्या प्रकल्पाच्या दारापर्यंत पायाभूत सुविधा उपलब्ध करून देईल. शहराच्या विकासादरम्यान येणाऱ्या अनेक अडचणी नितीन गडकरी आणि मी सोडविल्या आहेत. लवकरच मेट्रोचा प्लॅन येत आहे. बिल्डर्सने गुणवत्तापूर्ण बांधकाम आणि पारदर्शक व्यवहार ठेवल्यास नागपूरचा विकास शक्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. शासनाने २४० कोटींची पेरीअर्बन पाईपलाईन योजना आणली आहे. १५ जुलैपर्यंत सुरू होणार आहे. सिमेंटचे काम सुरू आहे. बेसा येथे पोलीस स्टेशन सुरू होणार आहे. बिल्डरला फ्लॉय अ‍ॅशवर आधारित उत्पादनांच्या निर्मितीसाठी लीजवर जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ही जागा डी-प्लस झोनमध्ये असल्यामुळे बिल्डर्सला अनेक योजनांचा फायदा मिळणार आहे. या ठिकाणी प्रति युनिट ४ रुपये दराने वीज मिळणार आहे. त्यामुळे अनेकांना रोजगार मिळेल आणि बांधकाम स्वस्तात होईल. बिल्डर्सने एकत्रित येऊन योजनेचा फायदा घ्यावा, असे आवाहन बावनकुळे यांनी केले. लोकमत प्रॉपर्टी एक्स्पोमध्ये फ्लॅट, प्लॉट, फार्म हाऊस, रो-हाऊस, दुकान, बंगलो किफायत दरात खरेदीची संधी आहे. सर्व स्टॉलवर गुढीपाडवा आॅफर सुरू आहे. एक्स्पोमध्ये प्रवेश नि:शुल्क असून २८ मार्चपर्यंत सकाळी ११ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहील. (प्रतिनिधी)लोकमत एक्स्पोमधील स्टॉलधारक बिल्डर्स व डेव्हलपर्सपिरॅमिड सिटी, टेकआॅप इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि., अथर्व इन्फ्रास्ट्रक्चर्स, द इम्पिरिएन, नानिक गु्रप, पायोनिअर, आदित्य इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि., ग्रीन स्पेस इन्फ्रा, संदीप व्डेलर्स प्रा.लि. (एसडीपीएल), नक्षत्र बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स, एचडीएफसी बँक, ओम शिवम बिल्डकॉन प्रा.लि., एन.के. रिएलेटर्स, इन्फ्राव्हेंचर प्रा.लि., श्री साई असोसिएट्स, पुष्कर होम्स प्रा.लि., प्रसन्ना डेव्हलपर्स, नीलगगन डेव्हलपर्स, डील माय प्रॉपर्टी डॉट कॉम, सुदर्शन सौर शक्ती प्रा.लि., हरीहर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि., सेंट्रल ट्रेड कॉर्पोरेशन (ओरेव्हा), आॅरबिटल एम्पायर, जय वॉलपेपर, ‘युनिक सिटी’ एव्हीसी होम्स, कन्सेप्ट बिल्डर्स, कृष्णा बिल्डकॉन, ग्रीन लाईन. विजेते : राजेश सोनवाने (सोन्याचे नाणे : पहिला पुरस्कार)