‘डीआरएम’ कार्यालय बंद असल्यामुळे महिला कर्मचाऱ्यांना चाइल्ड केअर लिव्ह घेण्यासाठी अडचण येत आहे. महिला कर्मचाऱ्यांना मुलांची देखभाल करण्यासाठी तसेच मुले १८ वर्षांची होईपर्यंत ७८० चाइल्ड केअर लिव्ह मिळतात. परंतु ‘डीआरएम’ कार्यालय बंद असल्यामुळे त्यांना रजा घेण्यात अडचण येत आहे. यासोबतच कर्मचाऱ्यांना लिव्ह इनकॅशमेंट करतानाही अडचण येत आहे. कार्यालय बंद असल्यामुळे कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधीही त्यांच्या खात्यात टाकण्यात आला नसल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली. कर्मचाऱ्यांची कामे खोळंबल्यामुळे त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे किमान कर्मचाऱ्यांची कामे होण्यासाठी मर्यादित कर्मचाऱ्यांना कामावर बोलाविण्याची मागणी कर्मचारी करीत आहेत. याबाबत रेल्वेमधील संघटनांनी अधिकाऱ्यांना ‘डीआरएम’ कार्यालय सुरू करून कर्मचाऱ्यांची कामे करण्याची मागणी केली आहे. परंतु अधिकारी संघटनांचे म्हणणे ऐकावयास तयार नसल्याची माहिती आहे.
‘डीआरएम’ कार्यालय बंद, कर्मचाऱ्यांची कामे खोळंबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 4:07 AM