लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात १ जुलैपासून होणाऱ्या वृक्षारोपण मोहिमेवर ड्रोनद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे. ड्रोन प्रत्येक वन परिक्षेत्र व स्थळांवर फिरून कुठल्या प्रजातीची व किती झाडे लावण्यात आली याचा व्हिडीओ तयार करणार आहे. ड्रोनद्वारे गोळा केलेली सर्व माहिती व्हिडीओ व फोटोसह आॅनलाईन अपलोड करण्यात येणार आहे.आतापर्यंत वृक्षारोपणाचे केवळ आकडे आॅनलाईन मिळत होते. यावर्षीपासून वृक्षारोपणाबरोबरच त्या स्थळाचे चित्रीकरण व आकडेसुद्धा उपलब्ध होणार आहे. पहिल्यांदा ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्यात येणार असल्याने वन अधिकारी व कर्मचाºयांमध्ये उत्सुकतेबरोबरच चिंतासुद्धा आहे. यासाठी प्रत्येक वनवृत्ता(सर्कल)मध्ये मुख्य वनसंरक्षकस्तरावर आवश्यकतेनुसार ड्रोन किरायाने घेण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे.विश्वसनीयता वाढेलवन मुख्यालयाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (सूचना व तंत्रज्ञान) प्रवीण श्रीवास्तव म्हणाले की, प्रशासनाने अधिसूचना काढून क्षेत्रीयस्तरावर सर्व फिल्ड आॅफिसरला ड्रोन किरायाने देण्याचे निर्देश दिले आहे. ड्रोनमुळे चित्रीकरण होत असल्याने आकड्यांसह वृक्षांची संख्यासुद्धा दिसून येईल. त्यामुळे वृक्षारोपणासंदर्भात विश्वसनीयता वाढणार आहे.
स्थानिक स्तरावर किरायाला घेऊन चर्चावृक्षारोपणाच्या चित्रीकरणासाठी निविदा न काढता स्थानिक स्तरावर ड्रोन किरायाने घेतल्यास क्वॉलिटी मिळले का? ड्रोन किरायाने घेण्यासंदर्भात काय नियम राहील, यात कुठली गडबड तर होणार नाही, अशा अनेक चर्चा वन विभागात सुरू आहेत.