लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनमुळे आर्थिक मंदी पसरली आहे. अशा स्थितीत रेल्वेत गुन्हेगारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेल्वे सुरक्षा दलाने खबरदारीचा उपाय म्हणून प्रत्येक रेल्वेगाडीत एक अधिकारी आणि चार जवान अशा पाच जणांची ड्युटी लावणे सुरू केले आहे. याशिवाय ड्रोनच्या मदतीने रेल्वे परिसरातील गुन्हेगारीवर ‘वॉच’ ठेवण्याची योजना आखली आहे.नागपूर रेल्वे स्थानकावर अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्याच्या सोबतीला आता ड्रोन खरेदी करण्यात येणार आहे. खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून, महिनाभरात ड्रोन खरेदी करण्यात येणार आहे. नागपूर विभागातील नागपूर, अजनी येथे ड्रोनच्या साहाय्याने गुन्हेगारीवर अंकुश लावण्याचा विचार आहे. त्यानंतर वर्धा, बल्लारशा आणि इतर महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर या ड्रोनचा वापर होणार आहे. नागपूर विभागात नागपूर, अजनीसह नऊ ठाणे आणि आठ चौक्या आहेत. प्रत्येक चौकीत एक मोटारसायकल असणे गरजेचे आहे. त्याचाही प्रस्ताव मंजूर झाला आहे. १५ दिवसात प्रत्येक चौकीला एक मोटारसायकल मिळणार आहे. मोटारसायकलच्या माध्यमातून गुन्हेगारांची चौकशी, तपास करण्यात येणार आहे. प्रत्येक ठिकाणी चारचाकी वाहन घेऊन जाणे शक्य नसल्याने मोटारसायकलच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. रेल्वेगाड्यात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मुंबई येथून १०० आरपीएफ जवानांची तुकडी बोलावण्यात आली आहे. या जवानांना रेल्वेगाड्यात तैनात करण्यात येत आहे. रेल्वे मंत्रालयाच्यावतीने २०० विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत. या गाड्यात आरपीएफचे जवान कर्तव्य बजावत आहेत. रेल्वेतील गुन्हेगारी वाढण्याची शक्यता असल्यामुळे आरपीएफने गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी योजना आखली आहे.लवकरच ड्रोन खरेदी करणाररेल्वेतील गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी ड्रोनची खरेदी करण्यात येणार आहे. सुरुवातीला नागपूर आणि अजनी रेल्वेस्थानकाच्या परिसरात ड्रोनद्वारे पाळत ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर रेल्वेस्थानकावर नजर केंद्रित करण्यात येणार आहे. रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येत आहे.आशुतोष पाण्ड्येय, विभागीय सुरक्षा आयुक्त, मध्य रेल्वे, नागपूर विभाग
ड्रोनद्वारे रेल्वे परिसरातील गुन्हेगारांवर ‘वॉच’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2020 1:33 AM
लॉकडाऊनमुळे आर्थिक मंदी पसरली आहे. अशा स्थितीत रेल्वेत गुन्हेगारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेल्वे सुरक्षा दलाने खबरदारीचा उपाय म्हणून प्रत्येक रेल्वेगाडीत एक अधिकारी आणि चार जवान अशा पाच जणांची ड्युटी लावणे सुरू केले आहे. याशिवाय ड्रोनच्या मदतीने रेल्वे परिसरातील गुन्हेगारीवर ‘वॉच’ ठेवण्याची योजना आखली आहे.
ठळक मुद्दे१२ मोटारसायकलची तरतूद : प्रत्येक रेल्वे गाडीत पाच जवानांची ड्युटी