शिकार व वाढलेली मासेमारी मुख्य कारण : ‘बर्ड आॅफ विदर्भ’तर्फे पक्षी गणनानागपूर : तलावांवर वाढती मासेमारी, पक्ष्यांची शिकार व काठावर मोबाईलमधील गाण्याच्या गोंगाटामुळे स्थलांतरित पक्ष्यांची संख्या २५ टक्क्यांनी कमी झाली आहे. ‘बर्ड आॅफ विदर्भ’ यांनी केलेल्या पक्षी गणनेतून ही माहिती समोर आली आहे. गेल्यावर्षी ११ हजारांपेक्षा जास्त पक्ष्यांची नोंद झाली होती. यावेळी ९,४१२ पक्षी आढळून आले आहेत. वनखात्याच्या दोन टप्प्यात पाणवठ्यावरील पक्ष्यांची गणना करण्यात आली. पहिला टप्पा २० डिसेंबर रोजी झाला. यात ४२ तलावांवर ७,१२७ पक्षी आढळून आले. मागील वर्षी ११ हजारावर पक्षी आढळले होते. १० जानेवारी रोजी झालेल्या दुसऱ्या टप्प्यात ८३ प्रजातींच्या ९,४१२ पक्ष्यांची नोंद झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही आकडेवारी २५ टक्क्यांनी कमी आहे. याला घेऊन पक्षी अभ्यासकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या संदर्भाचा अहवाल पर्यावरण मंत्र्यांना देण्याचा तयारीत पक्षिप्रेमी आहेत. (प्रतिनिधी)मत्स्य गरुड पक्षी आढळलादुर्मिळ असलेला राखडी डोक्याचा मत्स्य गरुड हा पक्षी जोडीने आढळला. ‘नीअर थ्रेटंन’ असलेल्या या प्रजातीचे लोहाराच्या तलावावर दर्शन झाल्याने पक्षिप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण होते. पक्षी गणनेत पक्षी निरीक्षकांसह अभ्यासक, पक्षिप्रेमी, रामदेवबाबा इंजिनिअरिंग कॉलेजचे शिक्षक व विद्यार्थी, विदर्भ नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संस्थापक सदस्य डॉ. अनिल पिंपळापुरे, प्रकाश गर्दे, मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते यांचाही सहभाग होता. पक्षी गणना यशस्वी करण्यासाठी बर्डस् आॅफ विदर्भचे सुरेंद्र अग्निहोत्री, नितीन मराठे, विनीत अरोरा, संकेत धाराशिवकर, संजय खोलीया आणि आशिष तिवारी यांनी योगदान दिले.तलावाच्या परिसरात शेतीपक्षी अभ्यासक अविनाश लोंढे यांनी सांगितले, पाटबंधारे विभागाने पाणी नसलेल्या तलावाच्या जागेवर शेती करण्याला परवानगी दिली आहे. याशिवाय तलावांवर अतिप्रमाणात होत असलेली मासेमारी, पार्ट्या, मोबाईलवर सुरू असलेली गाणी, या सर्वांचा परिणाम पक्ष्यांवर होत आहे. यामुळे स्थलांतरित पक्ष्यांसोबतच स्थानिक पक्ष्यांची संख्या रोडावली आहे. मासेमारीकरिता फेब्रुवारी ते नोव्हेंबरपर्यंतच कंत्राटे द्यावीत. त्यामुळे अन्न व साखळीतील प्रमुख घटक असलेल्या पक्ष्यांच्या संख्येत वाढ होण्यास मदत होईल.
स्थलांतरित पक्ष्यांच्या संख्येत २५ टक्क्याने घट
By admin | Published: January 18, 2016 3:01 AM