शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

नागपुरात ड्रग पेडलर करीम लाला जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 11:08 PM

Drug peddler Karim Lala arrested, Crime news शहरातील कुख्यात तडीपार गुंड करीम लाला याच्या गुन्हे शाखेच्या एनडीपीएस सेलने सोमवारी रात्री गिट्टीखदान परिसरात मुसक्या बांधल्या. त्याच्याकडून दोन लाख सात हजाराची एमडी जप्त करण्यात आली.

ठळक मुद्देदोन लाखाची एमडी जप्त : रॅकेटमधील साथीदार फरार

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहरातील कुख्यात तडीपार गुंड करीम लाला याच्या गुन्हे शाखेच्या एनडीपीएस सेलने सोमवारी रात्री गिट्टीखदान परिसरात मुसक्या बांधल्या. त्याच्याकडून दोन लाख सात हजाराची एमडी जप्त करण्यात आली.

मानकापूरच्या नागसेन सोसायटीत राहणारा अब्दुल करीम अजीज शेख (वय ३१) हा कुख्यात गुंड आहे. त्याच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात हत्या, हत्येचा प्रयत्न, हाणामारी, दंगा, दरोडा, सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे, घातक शस्त्रे बाळगणे असे १९ गंभीर गुन्हे दाखल असून, तो गुन्हेगारी वर्तुळात करीम लाला नावाने कुख्यात आहे. त्याला तडीपारही करण्यात आले आहे. अनेक गुन्हेगारी टोळ्यांशी संबंध असलेल्या करीम लालाला अमली पदार्थांचेही व्यसन आहे. जुगार आणि एमडीची लत असलेला करीम गेल्या काही दिवसापासून एमडी तस्करांच्या संपर्कात आल्याचीही चर्चा होती. त्यामुळे गुन्हे शाखेने त्याच्यावर नजर रोखली होती. एमडीची मोठी खेप घेऊन करीम लाला त्याच्या साथीदारांसह सोमवारी रात्री गिट्टीखदानमध्ये येणार असल्याची टीप मिळाल्यामुळे गुन्हे शाखेचे पथक सतर्क झाले. पोलिसांनी पोलीस लाईन टाकळी परिसरात जाळे पसरवले. ठरल्यानुसार रात्री १०.३० च्या सुमारास करीम नजरेस पडताच गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्यावर झडप घातली. त्याला जेरबंद करून झडती घेतली असता त्याच्याकडे ५१ ग्रॅम ७२ मिलीग्रॅम एमडी पावडर आढळले. बाजारपेठेनुसार आजघडीला त्याची किंमत २ लाख ६ हजार ८८० रुपये आहे. त्याला गुन्हे शाखेत नेऊन त्याची रात्रभर चौकशी करण्यात आली. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर करून पोलिसांनी त्याचा ३० ऑक्टोबरपर्यंत पीसीआर मिळवला.

साथीदारांची शोधाशोध

करीमच्या पोलिसांनी मुसक्या बांधताच त्याचे तीन साथीदार फरार झाले. मंगळवारी रात्रीपर्यंत पोलीस त्यांची शोधाशोध करीत होते.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अतिरिक्त आयुक्त सुनील फुलारी, गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन राजमाने, सहायक आयुक्त सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली एनडीपीएस सेलचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी बजावली. करीमच्या अटकेतून मोठ्या रॅकेटचा खुलासा होण्याची शक्यता निर्माण झाली.

टॅग्स :Drugsअमली पदार्थSmugglingतस्करीArrestअटक