शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
3
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
4
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
5
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
6
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
7
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
9
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
10
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
11
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
12
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
13
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
14
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
15
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
16
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
17
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
18
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
19
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
20
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी

तरुणांमध्ये वाढतोय ‘ड्राय आय सिंड्रोम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2019 10:51 AM

जर तुमच्या डोळ्यातून अश्रू येत नसतील तर तो एक आजार आहे. अश्रू न येण्याच्या म्हणजेच डोळे कोरडे होण्याच्या समस्येत वाढ होत आहे. यालाच ‘ड्राय आय सिंड्रोम’ असे म्हटले जाते. हा आजार युवकांमध्ये वाढत आहे.

ठळक मुद्देमेडिकलमध्ये रोज तीन टक्के रुग्णांवर उपचारस्मार्टफोन, लॅपटॉप, संगणक, एसी कारणीभूत

सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अश्रू म्हणजे आपल्या भावनांचं प्रतीक! कधी दुखावलो गेलो की डोळ्यात टचकन अश्रू बाहेर पडतात तर कधी अत्यानंद झाला की आनंदाश्रू येतात. पण जर तुमच्या डोळ्यातून अश्रू येत नसतील तर तो एक आजार आहे. अश्रू न येण्याच्या म्हणजेच डोळे कोरडे होण्याच्या समस्येत वाढ होत आहे. यालाच ‘ड्राय आय सिंड्रोम’ असे म्हटले जाते. हा आजार युवकांमध्ये वाढत आहे. स्मार्टफोन, लॅपटॉप, संगणकाच्या अतिवापरामुळे हा आजार बळावत आहे. मेडिकलच्या नेत्र रोग विभागात रोज येणाऱ्या रुग्णांमध्ये दोन ते तीन टक्के रुग्ण हे डोळे कोरडे होण्याच्या समस्येवर उपचारासाठी येत आहेत.वयोमानानुसार दृष्टी कमकुवत होते म्हणून वृद्धांमध्ये आणि रजोनिवृत्तीमुळे स्त्रियांमध्ये हा आजार दिसून येतो. या शिवाय, मधुमेह, उच्चरक्तदाब, रक्त पातळ करण्याच्या औषध घेणाऱ्या रुग्णांमध्येही ‘ड्राय आय सिंड्रोम’चा धोका असतो. परंतु आता सर्वच वयोगटांतील विशेषत: तरुण-तरुणींमध्ये ही समस्या प्रकर्षाने समोर येत असल्याचे मेडिकलच्या नेत्ररोग विभागाचे प्रमुख डॉ. अशोक मदान यांनी सांगितले. ते म्हणाले, डोळे कोरडे होण्याच्या समस्येचे मुख्य कारण, म्हणजे पापण्याही लवू न देता सतत संगणक आणि स्मार्टफोन स्क्र ीनकडे एकटक पाहत राहणे. या क्रियेत पापण्या लवणंच होत नाही. संगणकाचा वापर करताना मिनिटाला १० ते १५ वेळा पापण्या मिचकावणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष केले जाते. दुसरे म्हणजे, जास्तीतजास्त वेळ वातानुकूलित खोलीत घालविणे हेही एक कारण आहे. यामुळे डोळ्यात पाणी थांबत नाही. सतत डोळे वाहत असतात. यामुळे डोळे कोरडे पडतात. ही या आजाराची लक्षणे आहेत.

कॉण्टॅक्ट लेन्सेस व डोळ्यांचा मेकअप कारणीभूतशासकीय असो की खासगी नोकऱ्यांमध्ये अनेकाना संगणकावर डोळे लावून बसावेच लागते. असे लोक डोळ्यांच्या समस्येने त्रस्त असतात. डोळे कोरडे होण्याच्या काही कारणांमध्ये स्वयंप्रतिकार रोग तसेच अ‍ॅण्टिस्टॅमिना आणि अ‍ॅण्टिडप्रेसंट गोळ्यांचा वापर या गोष्टी कारणीभूत असतात. कोरड्या आणि वादळी हवामानामुळेही डोळे कोरडे होतात. कॉण्टॅक्ट लेन्सेस आणि डोळ्यांच्या मेकअपसाठी कारणीभूत आहेच. सकाळी उठल्यावर डोळ्यात जळजळणे हे मुख्य लक्षण आहे. याशिवाय खाज येणे, कधी कधी अंधुक दिसणे, डोळ्यातून पाणी बाहेर येणे डोळे कोरडे होण्याच्या समस्येला हा प्रतिसाद असतो. अधिक गंभीर प्रकरणांमध्ये कोरड्या डोळ्यांच्या पृष्ठभागावर उघड्या नसांवर सूक्ष्म कणनिर्मिती होऊन डोळ्यात एकदम खुपल्यासारख्या वेदना होऊ शकतात. बाहेरून फिरून आले की डोळे लाल होणे आणि नंतर आपोआप बरे होणे हा या आजाराचा ‘माईल्ड’ प्रकार आहे. ‘ड्राय आय सिंड्रोम’ची ही अगदी सुरु वातीची स्टेज, जी अनेकांमध्ये दिसते, असेही डॉ. मदान यांनी सांगितले.

टॅग्स :Healthआरोग्य