लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जि.प. प्रशासनाकडून शिक्षकांच्या प्रश्नांसंदर्भात जाणीवपूर्वक होत असलेल्या दिरंगाईमुळे जि.प.स्तरावर शिक्षकांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात प्रलंबित असून ते त्वरित निकाली काढण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने विभागीय आयुक्त संजीव कुमार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.मागील दोन वर्षांपूर्वी पदस्थापना देण्यात आलेल्या विषय पदवीधर शिक्षकांना अजूनपर्यंत पदवीधर वेतन श्रेणी लागू करण्यात आली नाही. मागील वर्षी बदली प्रक्रियेमध्ये अवघड गावे व महिलांसाठी प्रतिकूल गावे निश्चित करताना अनेक गावे सुटली; त्यांचा समावेश अवघड गावांच्या यादीत करण्याबाबत मागणी करूनही या गावांचा समावेश अवघड गावांच्या यादीत केल्या गेला नाही. निम्म्याहून अधिक प्रमाणात रिक्त असलेली शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुखांची पदे त्वरित भरण्यात यावी. बदलीतील विस्थापित व रँडम राऊंडमधील शिक्षकांना चालू बदली प्रक्रियेत अर्ज करण्याची संधी देण्यात यावी, जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांना आगाऊ वेतनवाढ लागू करणे. सेवा पूर्ण करणाऱ्या शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी लागू करण्यात यावी. शाळांचे विद्युत बिल ग्रा.पं. अथवा जि.प.ने भरावे. यासह अनेक महत्त्वाच्या मागण्यांसह महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष लीलाधर ठाकरे व सरचिटणीस अनिल नासरे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने विभागीय आयुक्त संजीव कुमार यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. निवेदनातील सर्व मागण्यांसंदर्भात जि.प. नागपूर प्रशासनाकडून आढावा घेऊन अहवाल सादर करण्याबाबतचे निर्देश उपायुक्त दीपक चौधरी यांना विभागीय आयुक्त संजीव कुमार यांनी यावेळी दिले. यावेळी दिनकर उरकांदे, विलास काळमेघ, सुरेश श्रीखंडे, दिगंबर ठाकरे, धर्मेंद्र गिरडकर, दिगांबर शंभरकर, विजय बरडे, अनिल श्रीगिरीवार आदी सहभागी झाले होते.
जि.प. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे शिक्षकांचे प्रश्न धूळ खात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 1:08 AM
जि.प. प्रशासनाकडून शिक्षकांच्या प्रश्नांसंदर्भात जाणीवपूर्वक होत असलेल्या दिरंगाईमुळे जि.प.स्तरावर शिक्षकांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात प्रलंबित असून ते त्वरित निकाली काढण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने विभागीय आयुक्त संजीव कुमार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे शिक्षक समितीचे विभागीय आयुक्तांना निवेदन