चक्रधर गभणे
लाेकमत न्यूज नेटवर्क
रेवराल : मुंबई-नागपूर-हावरा हा रेल्वेमार्ग माैदा-रेवराल-काेदामेंढी या राेडला छेदून जात असल्याने रेवराल (ता. माैदा) गावाजवळ रेल्वे फाटक आहे. येथील वाहतूक काेंडी साेडविण्यासाठी ‘रेल्वे ओव्हरब्रिज’च्या कामाला सुरुवात करण्यात आली. हे काम वर्षभरात पूर्ण करणे अनिवार्य असताना एक वर्ष नऊ महिने पूर्ण हाेऊनही केवळ ४५ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या कामाचा संथ वेग डाेकेदुखी ठरला असून, अपघातांना कारणीभूत ठरणारी रेल्वे फाटकाजवळील वाहतूक काेंडी कायम आहे.
मुंबई-नागपूर-हावरा रेल्वेमार्गावर धावणाऱ्या प्रवासी रेल्वेगाड्यांसाेबतच व मालगाड्यांची संख्या अधिक आहे. काेराेना संक्रमणामुळे प्रवासी गाड्यांची संख्या थाेडी कमी झाली असली तरी मालगाड्यांची संख्या अधिक असल्याने रेवराल परिसरातील फाटक दर १५ मिनिटांनी बंद केले जाते. ते उघडण्यासाठी १५ ते २० मिनिटे प्रतीक्षा करावी लागते. माैदा-रेवराल-काेदामेंढी हा मार्ग वर्दळीचा असल्याने या फाटकाजवळील अपघातास कारणीभूत ठरणारी वाहतूक काेंडी गंभीर बनली आहे.
ही समस्या साेडविण्यासाठी ‘एमआरआयडीसी’ (ओव्हरब्रिज महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट काॅर्पाेरेशन)ने या फाटकाजळ रेल्वे तयार करण्याचा निर्णय घेतला. ‘एमआरआयडीसी’ने पुरेसा निधी मंजूर करून देत कंत्राटदार कंपनीमार्फत रेल्वे ओव्हरब्रिजच्या कामाला ७ जानेवारी २०२० राेजी सुरुवात केली. हे काम ३६० दिवसात म्हणजेच वर्षभरात पूर्ण करण्याचे निर्देशही ‘एमआरआयडीसी’ने कंत्राटदार कंपनीला दिले हाेते.
हे काम सुरू हाेऊन आज एक वर्ष नऊ महिने पूर्ण झाले आहेत. या काळात रेल्वे ओव्हरब्रिजचे काम किमान ८० टक्के तरी पूर्ण हाेणे अपेक्षित हाेते. वास्तवात ते ४० ते ४५ टक्केच पूर्ण झाले आहे. मालगाड्यांच्या वर्दळीमुळे फाटक दर १५ मिनिटाला बंद केले जाते आणि वाहनचालकांना ताटकळत उभे राहावे लागते. त्यातच या फाटकाजवळ हाेणाऱ्या वाहतूक काेंडीमुळे अपघातही हाेत आहे. परिणामी, रेल्वे ओव्हरब्रिजच्या कामाची संथगती डाेकेदुखी ठरत असल्याच्या प्रतिक्रिया या भागातील वाहनचालकांनी व्यक्त केल्या आहेत.
...
५० काेटी ७० लाख रुपये किंमत
या रेल्वे ओव्हरब्रिजसाठी ५० काेटी ७० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. याची लांबी ६९७.७०० मीटर असून, या कामाला ७ जानेवारी २०२० राेजी सुरुवात करण्यात आली. हे काम ३६० दिवसात म्हणजेच २ जानेवारी २०२१ पर्यंत पूर्ण करावयाचे हाेते. या कामाचे कंत्राट केव्हीआरईसीपीएल नामक कंत्राटदार कंपनीला दिले आहे.
...
शेतकऱ्यांचा माेबदला रखडला
या रेल्वे ओव्हरब्रिजच्या बांधकामासाठी रेवराल येथील काही शेतकऱ्यांची शेती अधिग्रहित करण्यात आली. यातील वैशाली दादुरे, नरसिंग दादुरे, आशिष पाटील, हरिश्चंद्र मदनकर, दूधराम उरकुडे व जितेंद्र उरकुडे यांचा समावेश आहे; मात्र या सहा शेतकऱ्यांच्या शेतीचे अधिग्रहण करूनही त्यांना अद्याप माेबदला देण्यात आला नाही. त्यामुळे त्यांनी त्यांच्या जमिनीवरील ताबा साेडला नाही.
...
अपघात वाढले
या रेल्वे ओव्हरब्रिजसाठी तीनदा सर्वेक्षण करण्यात आले हाेते. याच्या कामाला सुरुवात हाेताच येथील रहदारी धाेकादायक बनली आहे. या भागातील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या विविध शासकीय व निमशासकीय कार्यालये तसेच रुग्णालयांमध्ये जाण्यासाठी माैदा-रेवराल-काेदामेंढी मार्गाला दुसरा पर्याय नाही. या ठिकाणी हाेणारी वाहतूक काेंडी व माती-चिखलामुळे वाहने घसरत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
...
या रेल्वे ओव्हरब्रिजचे काम अतिशय संथगतीने सुरू असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागताे. कंत्राटदार कंपनीने हे बांधकाम लवकर पूर्ण करावे.
- चिंतामन मदनकर,
सरपंच, रेवराल.
...
बांधकाम सुरू असल्याने नागरिकांना रहदारी करताना त्रास हाेत आहे. हे काम शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- मधुसुदन रेड्डी,
साईट इन्चार्ज, रेवराल.
150921\42294953img_20210909_130034.jpg
ल्वे ओव्हरब्रिजचे काम संथगतीने