शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

‘एस्मा’ मुळे सहा महिने आंदोलनाला बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 12:19 AM

एस्मा कायद्यानुसार बडतर्फ करण्यासोबतच गैरहजर दिवसाच्या आठपट दंड आकारण्याची तरतूद आहे. तसेच पुढील सहा महिने एस्मा कायम असल्याची माहती महापालिकेच्या परिवहन विभागातील अधिकारी योगेश लुंगे यांनी दिली.

ठळक मुद्देआपली बस सेवा सुरळीत : हजर नसलेल्या दिवसाच्या आठपट दंडाची तरतूद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर - राज्य शासनाने महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण अधिनियम २०११ (एस्मा)च्या तरतुदीनुसार मंगळवारी आपली बस कर्मचाऱ्यांच्या संपावर बंदी घातली. त्यानंतरही दुसऱ्या दिवशी सायंकाळपर्यत कर्मचारी कामावर परतले नव्हते. अखेर गुरुवारी चालक-वाहक कामावर आले. एस्मा कायद्यानुसार बडतर्फ करण्यासोबतच गैरहजर दिवसाच्या आठपट दंड आकारण्याची तरतूद आहे. तसेच पुढील सहा महिने एस्मा कायम असल्याची माहती महापालिकेच्या परिवहन विभागातील अधिकारी योगेश लुंगे यांनी दिली.एस्मा लागू असताना संप केल्यास कठोर कारवाईची तरतूद आहे. कारवाईच्या धास्तीने आपली बसच्या कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याने गुरुवारी शहर बससेवा सुरळीत सुरू झाली. यामुळे विद्यार्थी व प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. गुुरुवारी तीन आॅपरेटरच्या ३२८ तसेच २५ ग्रीन बसेस सुरू होत्या. एस्मामुळे कर्मचारी संघटनेने संप मागे घेतल्याने गुरुवारी सर्व कर्मचारी कामावर हजर झाले. परंतु संप कालावधीतील दोन दिवसाचे वेतन कपात केले जाणार आहे. तसेच दंड आकारायचा की नाही, याबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार परिवहन समिती व परिवहन व्यवस्थापक यांना आहे.मंगळवारी शासनाने एस्मा लागू केल्यानतंर शिवसेनाप्रणीत भारतीय कामगार सेनेने संप मागे घेतल्याची घोषणा के ली होती. परंतु प्रत्यक्षात बुधवारी दुपारी ३ वाजेपर्यंत शहरातील रस्त्यांवर जेमतेम ५० बसेस सुरू होत्या. ३२५ बसेस डेपोतच उभ्या असल्याने शहर बससेवा ठप्पच होती. यामुळे विद्यार्थी व प्रवाशांना कमालीचा मनस्ताप सहन करावा लागला. तसेच महापालिकेला यामुळे ३५ लाखांचा फटका बसला. एस्मानंतरही कामावर रुजू न झाल्याने महापालिकेच्या परिवहन विभागाने १८ चालक व वाहकांना सेवेतून बडतर्फ केले आहे. तसेच चौकशीनतंर अन्य कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत परिवहन विभागाने दिले आहेत.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाBus Driverबसचालक