शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

खोदकामामुळे नागपुरात ६.८७ कोटींची वीज केबल खराब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 11:14 AM

शहरामध्ये ठिकठिकाणी विकासकामे सुरू आहेत. मेट्रो रेल्वे प्रत्यक्षात येत आहे. सिमेंट रोड व उड्डाण पूल तयार होत आहेत. याचा सर्वांना आनंद आहे. परंतु, या कामामुळे वीज वितरण प्रणालीचे मोठे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्दे१७८ ठिकाणी नुकसान विकास एजन्सीजनी दिली नाही भरपाई

कमल शर्मा।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरामध्ये ठिकठिकाणी विकासकामे सुरू आहेत. मेट्रो रेल्वे प्रत्यक्षात येत आहे. सिमेंट रोड व उड्डाण पूल तयार होत आहेत. याचा सर्वांना आनंद आहे. परंतु, या कामामुळे वीज वितरण प्रणालीचे मोठे नुकसान झाले आहे. मार्च-२०१७ पासून आतापर्यंत १७८ ठिकाणांवरील एकूण ६.८७ कोटी रुपयांचे वीज केबल खराब झाले आहेत. वीज वितरण फ्रेन्चायसीने भरपाईची मागणी केली असून विकास एजन्सीज त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.केबल खराब करण्याची सुरुवात १ एप्रिल रोजी भगवाननगरातून झाली. एल अ‍ॅन्ड टी कंपनीने स्मार्ट सिटी वर्क योजनेंतर्गत केलेल्या खोदकामात ३.६० लाख रुपयांचे वीज केबल पूर्णपणे खराब झाले. ३७६० ग्राहकांचा वीज पुरवठा बंद झाला. त्यानंतर हे प्रकार सतत सुरू आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, महामेट्रो, ओसीडब्ल्यू, रिलायन्स आदींनी खोदकाम करताना विजेचे केबल खराब केले. २०१७ मध्ये ९७ ठिकाणी वीज केबलचे नुकसान झाले.२०१८ मध्येही परिस्थितीत सुधारणा झाली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने ५ जानेवारी रोजी नारा येथे खोदकाम करताना वीज केबल खराब केले. त्यामुळे २८ हजार ९९८ ग्राहकांचा वीज पुरवठा बंद झाला व ४ लाख ७३ हजार २५० रुपयांचे नुकसान झाले. १७ आॅगस्ट रोजी मेट्रो रेल्वेच्या कामादरम्यान लष्करीबाग येथे ३ लाख ६० हजार रुपयांचे केबल खराब करण्यात आले. त्यामुळे १० हजार ६२४ ग्राहकांची वीज बंद पडली. एसएनडीएलने या सर्व प्रकरणांची माहिती महावितरणला दिली आहे. विकास एजन्सीजना नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे. परंतु, त्यावर कुणीच उत्तर दिलेले नाही. सध्या केबलची तात्पुरती दुरुस्ती करून वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. परिणामी, कोणत्याही क्षणी वीज पुरवठा बंद होऊ शकतो. तसेच, विजेचा प्रवाह पसरून प्राणहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

खोदकाम करताना नकाशा पाहिला जात नाहीकुठेही खोदकाम करताना पाईप लाईन व विजेचे केबल कुठे आहे याची माहिती घेण्यासाठी नकाशे पाहणे आवश्यक आहे. काही ठिकाणी जुनी पाईप लाईन असल्यामुळे त्याचे नकाशे उपलब्ध नाहीत. परंतु, पाईप लाईन कुठून जात आहे याची माहिती उपलब्ध आहे. दोन्ही एजन्सीजनी आपसात समन्वय ठेवल्यास नुकसान टाळले जाऊ शकते. नियमानुसार मनपा व महावितरण कंपनीला खोदकामाची माहिती देणे अनिवार्य आहे. परंतु, विकास एजन्सीज हा नियम पाळत नाही. त्यामुळे नुकसान तर होतेच, मोठी दुर्घटना घडण्याची शक्यताही बळावते.

खोदकामामुळे वीज केबल खराब होत असल्याची माहिती विकास एजन्सीजसह पालकमंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांना देण्यात आली आहे. कंपनीला भरपाईपेक्षा वीज केबलची जास्त चिंता आहे. खराब झालेले केबल दुरुस्त करून वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. भविष्यात ब्रेकडाऊन होऊ शकतो. त्यावेळी खोदकाम करून नवीन केबल टाकावे लागतील.- सोनल खुराणा, बिझनेस हेड, एसएनडीएल.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा