शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
5
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
6
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
8
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
9
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
10
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
11
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
12
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
13
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
15
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
16
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
17
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
18
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
19
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस

‘नीट’मुळे एका पिढीच्या भविष्याचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2016 2:19 AM

सर्वोच्च न्यायालयाचा आपण आदर करतो. परंतु ‘नीट’ विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक आहे.

देवेंद्र फडणवीस : सर्वोच्च न्यायालयाने विद्यार्थीहित पाहावेनागपूर : सर्वोच्च न्यायालयाचा आपण आदर करतो. परंतु ‘नीट’ विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक आहे. ‘नीट’च्या निर्णयामुळे एका पिढीच्या भविष्याचे नुकसान होण्याचा धोका आहे, या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयाने ‘नीट’बाबत दिलेल्या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने विचार करावा, असे प्रतिपादन त्यांनी एका कार्यक्रमात केले.महाराष्ट्रात वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी ‘सीईटी’ दिली. परंतु ‘एमबीबीएस’ व ‘बीडीएस’चे प्रवेश ‘नीट’च्या माध्यमातूनच होतील, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला व राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना धक्का बसला. राज्यभरात विद्यार्थी व पालकांमध्ये यामुळे संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी नागपुरात भाष्य केले.‘नीट’ चा मुद्दाच विद्यार्थ्यांसाठी खरोखरच अन्यायकारक आहे. विद्यार्थी वेगळ््या अभ्यासक्रमाची तयारी करत असताना, एका दिवसात म्हणता की ‘सीबीएससी’च्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा द्या. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय आहे व आपल्या देशात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर टीका करता येत नाही. सर्वोच्च न्यायालय आपल्यासाठी मोठीच गोष्ट आहे. परंतु न्यायालयानेदेखील विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करायला हवा. कायदा आपल्या जागी आहे व तो ठीकदेखील आहे. परंतु यामुळे जर एका पिढीचे नुकसान होत असताना याचा विचार व्हायला हवा, असे मुख्यमंत्री म्हणाले. टी.व्ही., इंटरनेटवरून ‘नीट’चे धडे - तावडे‘नीट’ परीक्षेला सामोरे जाण्यासाठी राज्य सरकार १९ मेपासून विद्यार्थ्यांना धडे देण्याची तयारी करत आहे. त्यासाठी टी.व्ही. आणि इंटरनेटचे माध्यम वापरणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शनिवारी मुंबईत दिली.राज्य सरकार विद्यार्थ्यांची पूर्वतयारी करून घेणार आहे. दररोज एका तासात दोन विषय प्रत्येकी अर्धा तास शिकविण्यात येतील. या प्रशिक्षणासाठी काही वृत्तवाहिन्यांनी कोणताही आर्थिक मोबदला न घेता प्रसारणाची तयारी दाखविलेली आहे. शिकवणीसाठी मोबाईल अ‍ॅप्लिकेशन तयार केले जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी सोमवारी नवी दिल्लीत सर्व वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. त्यात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर एमबीबीएस आणि बीडीएसच्या विद्यार्थ्यांसाठी नव्या पर्यायाचा शोध घेतला जाईल, असे ते म्हणाले. राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटणारराज्यातील बहुतेक वैद्यकीय महाविद्यालये ही काँग्रेस नेत्यांची असल्याने त्यांच्या अडचणी वाढविण्यासाठी भाजपाच्या राज्यातील सरकारने नीट परीक्षेचा खेळखंडोबा चालविला आहे, असा आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. ‘नीट’च्या प्रश्नावर आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊ, असे ते म्हणाले. ‘नीट’संदर्भात पालक आणि विद्यार्थ्यांनी शनिवारी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन आपले गाऱ्हाणे मांडले. (प्रतिनिधी)हवा, असे मुख्यमंत्री म्हणाले. टी.व्ही., इंटरनेटवरून ‘नीट’चे धडे - तावडे‘नीट’ परीक्षेला सामोरे जाण्यासाठी राज्य सरकार १९ मेपासून विद्यार्थ्यांना धडे देण्याची तयारी करत आहे. त्यासाठी टी.व्ही. आणि इंटरनेटचे माध्यम वापरणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शनिवारी मुंबईत दिली.राज्य सरकार विद्यार्थ्यांची पूर्वतयारी करून घेणार आहे. दररोज एका तासात दोन विषय प्रत्येकी अर्धा तास शिकविण्यात येतील. या प्रशिक्षणासाठी काही वृत्तवाहिन्यांनी कोणताही आर्थिक मोबदला न घेता प्रसारणाची तयारी दाखविलेली आहे. शिकवणीसाठी मोबाईल अ‍ॅप्लिकेशन तयार केले जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी सोमवारी नवी दिल्लीत सर्व वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. त्यात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर एमबीबीएस आणि बीडीएसच्या विद्यार्थ्यांसाठी नव्या पर्यायाचा शोध घेतला जाईल, असे ते म्हणाले. राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटणारराज्यातील बहुतेक वैद्यकीय महाविद्यालये ही काँग्रेस नेत्यांची असल्याने त्यांच्या अडचणी वाढविण्यासाठी भाजपाच्या राज्यातील सरकारने नीट परीक्षेचा खेळखंडोबा चालविला आहे, असा आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. ‘नीट’च्या प्रश्नावर आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊ, असे ते म्हणाले. ‘नीट’संदर्भात पालक आणि विद्यार्थ्यांनी शनिवारी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन आपले गाऱ्हाणे मांडले. (प्रतिनिधी)