शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
3
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
4
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
5
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
6
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
7
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
8
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
9
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
10
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
11
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
12
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
14
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
15
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
16
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
17
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
18
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
19
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...

होमिओपॅथीमुळे दुर्धर आजार होत आहेत बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2018 8:49 PM

होमिओपॅथी उपचारपद्धती मनोरचना व मनोकार्याशी जवळीक साधते. रुग्णाच्या मानसिक स्थितीचा अभ्यास करते. त्याच्या वर्तणूक, वागणूक व व्यक्तिमत्त्वामधील सूक्ष्म बदल अनुभवून योग्य औषधांची निवड करते. यामुळे ही पॅथी आजाराला बरे करीत नाही तर आजारी रुग्णाला बरे करते. हृदयविकाराचा झटका आलेल्या, ‘बायपास’ सांगितलेल्या, आठ वर्षांपासून वंध्यत्व असलेल्या, मानसिक आजार असलेल्या, अस्थमा असलेल्या रुग्णांसोबतच गंभीर त्वचारोग या सारख्या असंख्य रुग्णांना होमिओपॅथीद्वारे बरे करण्यात आले आहे, असा सूर होमिओपॅथी तज्ज्ञांनी काढला.

ठळक मुद्देहोमिओपॅथी तज्ज्ञांचा सूर : हृदयविकार, वंध्यत्व, त्वचारोग, अस्थमा, मानसिक आजारावर यशस्वी उपचारजागतिक होमिओपॅथी दिन

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : होमिओपॅथी उपचारपद्धती मनोरचना व मनोकार्याशी जवळीक साधते. रुग्णाच्या मानसिक स्थितीचा अभ्यास करते. त्याच्या वर्तणूक, वागणूक व व्यक्तिमत्त्वामधील सूक्ष्म बदल अनुभवून योग्य औषधांची निवड करते. यामुळे ही पॅथी आजाराला बरे करीत नाही तर आजारी रुग्णाला बरे करते. हृदयविकाराचा झटका आलेल्या, ‘बायपास’ सांगितलेल्या, आठ वर्षांपासून वंध्यत्व असलेल्या, मानसिक आजार असलेल्या, अस्थमा असलेल्या रुग्णांसोबतच गंभीर त्वचारोग या सारख्या असंख्य रुग्णांना होमिओपॅथीद्वारे बरे करण्यात आले आहे, असा सूर होमिओपॅथी तज्ज्ञांनी काढला.१० एप्रिल हा दिवस जागतिक होमिओपॅथी दिन म्हणून साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर शहरातील होमिओपॅथी तज्ज्ञांनी एकत्र येऊन सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आॅरेंज सिटी होमिओपॅथी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मनीष पाटील, डॉ. सोनल पंचभाई, डॉ. स्वप्निल घायवट, डॉ. कुणाल अंबाडे, डॉ. सचिन धमगाये, डॉ. स्मिता अडकिने, डॉ. यशस्वी सातपुते, डॉ. रूपाली कारवा व डॉ. खुशबू मुरारका आदी उपस्थित होते.डॉ. पाटील म्हणाले, होमिओपॅथीमध्ये आजाराचे मूळ शोधून त्यावर उपचार केला जातो. यामुळे आजार समूळ नष्ट होण्यास मदत होते. दुर्दैवाने लोक होमिओपॅथीकडे तेव्हाच जातात जेव्हा गंभीर समस्या आणखी जुनी झालेली असते. साहजिकच अशा प्रकरणांमध्ये उपचार करण्याला कालावधी जास्त लागतो आणि लोक होमिओपॅथी तेव्हा स्वीकारतात जेव्हा बाकी उपचार पद्धती अयशस्वी होते. असे असले तरी अनेक दुर्धर आजाराचे रुग्ण होमिओपॅथीने बरे झाले आहेत.‘बायपास’वर होमिओपॅथीयावेळी होमिओपॅथीमुळे बरे झालेल्या रुग्णांनी आपले अनुभव सांगितले, ५१ वर्षीय संजय गडपायले म्हणाले, अ‍ॅन्जिओग्राफीमध्ये ९९ टक्के ब्लॉकेज आढळून आले. यामुळे डॉक्टरांनी ‘बायपास’ करण्याचा सल्ला दिला. परंतु शस्त्रक्रिया करायची नव्हती म्हणून होमिओपॅथीचे उपचार घेतले आणि थोड्याच दिवसात बरे वाटू लागले. त्यानंतर केलेल्या रक्ताच्या तपासण्या सर्वसामान्य आल्या. ४००वर पोहचलेले कोलेस्ट्रॉलही सामान्य झाले, असेही त्यांनी सांगितले. सविता पाटील म्हणाल्या, अचानक हृदयविकाराचा झटका येऊन बेशुद्ध पडले. ईसीजी काढल्यावर त्यात हृदयविकाराचा झटका आल्याचे आढळून आले. होमिओपॅथी तज्ज्ञाने उपचार केला व काही तासात बरे वाटू लागले. तरीही डॉक्टरांनी देखभालीसाठी रात्रभर हॉस्पिटलमध्ये भरती ठेवून दुसऱ्या दिवशी सुटी दिली. ईसीजीपासून इतर सर्व तपासण्या सामान्य आहेत, असेही त्या म्हणाल्या.

वंध्यत्वावर होमिओपॅथी प्रभावशाली

मोना जोशी या महिलेने सांगितले, लग्नानंतर मूल न झाल्याने वंध्यत्वावर नागपुरातील स्त्री व प्रसूती रोगतज्ज्ञाकडून उपचार घेतले, शेवटी मुंबईतही उपचार घेतले. सलग आठ वर्षे उपचार घेऊनही वंध्यत्वाची समस्या कायम होती. शेवटचा पर्याय म्हणून होमिओपॅथीचे उपचार घेतले आणि महिन्याभरातच गर्भ राहिला. आज मुलगी पाच वर्षांची आहे, असेही त्या म्हणाल्या. यावेळी अन्य रुग्णांनीही आपले अनुभव कथन केले. गंभीर रोगावर होमिओपॅथीशिवाय पर्याय नाही असे त्यांचे म्हणणे होते.

१९७८ पासून मनपा होमिओपॅथीचे दोनच क्लिनिकडॉ. मनीष पाटील म्हणाले, होमिओपॅथी मुळासकट आजार बरा करीत असली तरी महानगरपालिकेकडून ही पॅथी दुर्लक्षित झाली आहे. मनपाने १९७८ मध्ये दोन होमिओपॅथी क्लिनिक सुरू केले, परंतु आजही त्यांची संख्या दोनच आहे. त्या तुलनेत अ‍ॅलोपॅथी क्लिनिकची संख्या वाढली आहे. 

टॅग्स :doctorडॉक्टरHealthआरोग्य