शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

बायोमेट्रिकअभावी अडला दुष्काळग्रस्त भागातील पोषण आहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 9:15 PM

न्यायालयाच्या निर्देशानुसार शासनाने दुष्काळग्रस्त भागात उन्हाळ्याच्या सुट्यातही विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार योजना राबवून आधार दिला होता. पण पोषण आहारातील बोगसगिरी रोखण्यासाठी विद्यार्थ्यांची हजेरी बायोमेट्रिकवर घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. पण एकाही शाळेत बायोमेट्रिक नसल्याने पोषण आहाराचा लाभ विद्यार्थ्यांना घेता आला नाही. नागपूर जिल्ह्यात तीन तालुक्यांचा समावेश दुष्काळाच्या यादीत आहे. येथे एकाही शाळेत पोषण आहार सुरू नाही. सूत्रांच्या मते, हीच अवस्था संपूर्ण राज्यात आहे.

ठळक मुद्देएकाही शाळेत बायोमेट्रिक नाही : योजनेला प्रतिसाद नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : न्यायालयाच्या निर्देशानुसार शासनाने दुष्काळग्रस्त भागात उन्हाळ्याच्या सुट्यातही विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार योजना राबवून आधार दिला होता. पण पोषण आहारातील बोगसगिरी रोखण्यासाठी विद्यार्थ्यांची हजेरी बायोमेट्रिकवर घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. पण एकाही शाळेत बायोमेट्रिक नसल्याने पोषण आहाराचा लाभ विद्यार्थ्यांना घेता आला नाही. नागपूर जिल्ह्यात तीन तालुक्यांचा समावेश दुष्काळाच्या यादीत आहे. येथे एकाही शाळेत पोषण आहार सुरू नाही. सूत्रांच्या मते, हीच अवस्था संपूर्ण राज्यात आहे.राज्यातील १५१ तालुक्यांत दुष्काळ असल्याचे राज्य शासनाने ऑक्टोबर महिन्यात जाहीर केले आहे. इतर योजनांसोबतच शालेय पातळीवरही दिलासा देण्यासाठी पोषण आहार सुरू करण्यात आला होता. पोषण आहार शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, खासगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळांत शिकणाऱ्या आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. सर्वोच्च न्यायालयात दुष्काळग्रस्त भागात लागू विविध उपाययोजनांसोबतच शालेय पोषण आहारासाठी मुद्दा एका याचिकेद्वारे उपस्थित झाला होता. त्यावर १३ मे २०१६ रोजी न्यायालयाने आहाराबाबत स्पष्ट सूचना दिल्यानंतर केंद्र शासनाने सुटी कालावधीत आहार देण्याचे सूचित केले होते. याच अनुषंगाने शालेय शिक्षण विभागाने संबंधित अधिकाऱ्यांना विद्यार्थ्यांच्या याद्या तयार करण्याच्या सूचना केल्या होत्या. आठवड्यातून तीन दिवस अंडी, दूध, फळे व पौष्टिक आहार पुरविण्याचे ठरले होते. त्यासाठी प्रति विद्यार्थी प्रति दिन पाच रुपये याप्रमाणे आठवड्यासाठी १५ रुपयांची तरतूद केली जाणार होती. हा निधी केंद्राच्या नव्हे तर राज्याच्या वाट्यातून उपलब्ध होणार होता. पण त्यासाठी बायोमेट्रिकवर विद्यार्थ्यांची हजेरी घेणे आवश्यक होते.दुष्काळग्रस्त भागातील शाळांमध्ये लोकसहभाग किंवा ग्रामनिधीच्या माध्यमातून बायोमेट्रिक मशीन लावण्याच्या सूचना होत्या. पण बायोमेट्रिक मशीन शाळांमध्ये लागल्या नाहीत. त्यामुळे पोषण आहारसुद्धा दुष्काळी तालुक्यांमध्ये सुरू झाला नाही.अन्यही अडचणी आहेतकेवळ जेवणासाठी विद्यार्थी शाळेत येतील, अशी अवस्था दुष्काळग्रस्त भागात अजूनही नाही. तसेच शाळेला सुट्या लागल्यानंतर विद्यार्थी शाळेत येत नाहीत. बायोमेट्रिकसाठी पैसे गोळा करणे इतके सोपे नाही. त्यामुळे शासनाने योजना राबविण्याचा निर्णय घेतला तरी या बाबीही अडचणीच्या ठरतात, असे शिक्षकांचे मत आहे.

टॅग्स :foodअन्नSchoolशाळा