लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आरक्षणाच्या नावावर सरकार राजकीय पोळी शेकत आहे. सरकारने ७८ टक्क्यावर आरक्षण नेऊन ठेवल्याने खुल्या वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात आले आहे. आरक्षणामुळे मेरिटवर अन्याय नको, अशी भूमिका घेऊन ‘सेव्ह मेरिट सेव्ह नेशन’ असा आवाज देत विविध जाती, धर्माच्या संघटनांनी ऐकत्र येऊन भव्य मोर्चा काढला. आरक्षणाचे समर्थन करणाऱ्या सरकारच्या धोरणाचा निषेध करीत ५० टक्क्यावर आरक्षण मंजूर नाही, असा सूर आळवला.सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला बगल देत पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशात ७८ टक्क्यांपर्यंत आरक्षण लागू करण्याचा अध्यादेश काढला. सरकारचे हे धोरण खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमापासून वंचित ठेवण्याचे आहे. सरकारचे हे धोरण हाणून पाडण्यासाठी नागपुरात एक चळवळ सुरू झाली आहे. विद्यार्थी, पालक यांच्यासोबतच विविध समाजाच्या, जाती-धर्माच्या संघटना एकत्र आल्या आहेत. आरक्षणाचा टक्का ७८ वर गेल्याने शैक्षणिक पात्रता आणि स्पर्धेत रॅँक मिळवूनही पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जेमतेम १० ते १२ टक्के जागा खुल्या वर्गाच्या पदरात पडत आहे. काही वैद्यकीय शाखांचे दरवाजेच खुल्या वर्गासाठी बंद झाले आहे. हीच अवस्था आता इतर अभ्यासक्रमातही खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांची होणार आहे. भविष्यातील हा धोका ओळखून खुल्या वर्गात मोडणाºया विविध जाती-धर्माच्या संघटना सरसावल्या आहेत.या संघटनांचा आक्रोश शुक्रवारी मोर्चाच्या माध्यमातून दिसून आला. यशवंत स्टेडियम येथून निघालेल्या मोर्चांमध्ये हजारो लोक सहभागी झाले होते. यात विद्यार्थी, पालक व शहरातील प्रसिद्ध डॉक्टरांचा सहभाग होता. मोर्चाच्या सुरुवातीला पाऊस आला तरी, मोर्चामध्ये उत्साह कायम होता. हातात सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन या स्लोगनचे बॅनर, पोस्टर्स मोर्चेकरी झळकवत होते. सरकारच्या आरक्षणाच्या धोरणाविरुद्ध मोर्चेकऱ्यांनी जोरदार नारेबाजी केली. काही उत्साही मोर्चेकºयांनी संपूर्ण आरक्षणाच्या विरोधातच घोषणाबाजी केली. मोर्चा संविधान चौकात पोहचल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी नाट्य दिग्दर्शक संजय पेंडसे निर्मित पथनाट्य सादर करण्यात आले. यानंतर डॉ. लद्धड, डॉ. संजय देशपांडे, डॉ. अनुप मरार यांनी मार्गदर्शन केले. सभेनंतर जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.आरक्षण हटाव, देश बचाओच्या घोषणामोर्चात सहभागी काही लोकांनी ‘आरक्षण हटाव, देश बचाओ’च्या घोषणाही दिल्या. काहींच्या हातातील फलकही आरक्षण विरोधी होते. यात, ‘हमे न्याय चाहिये, कोई खैरात नही, राष्ट्र की पहचान योग्यता है, आरक्षण नही’, ‘इधर करते चांद की तैयारी, उधर फैलाते आरक्षण की बिमारी, कैसी है यह सरकार हमारी’, ‘जिस देश मे खुद को पिछडा सिद्ध करने की होड लगी हो, वह देश आगे कैसे बढेगा’, ‘आरक्षणामुळे शिक्षणाचा खालवतोय दर्जा’ असे काही फलक दिसून आले.सरकारचे आरक्षणाचे राजकारण चालू देणार नाहीसर्वोच्च न्यायालयाने आरक्षण नाकारल्यानंतरही सरकारने वैद्यकीय अभ्यासक्रमात ७८ टक्के आरक्षणाचा अध्यादेश काढला. सरकारच्या या जिद्दी मनोवृत्तीला आम्ही पुन्हा न्यायालयात चॅलेंज दिला आहे. सरकार आरक्षणाच्या नावावर राजकारण करीत आहे. पण आता पालक, समाज सजग झाला आहे. आजचा मोर्चा हा त्याचा परिणाम आहे. सरकार आरक्षणाच्या नावावर व्होटबॅँकेचे राजकारण खेळत असेल, तर आम्हीही चोख प्रत्यूत्तर देऊ.डॉ. अनिल लद्धडया संस्थांचा सहभागनाग विदर्भ सेंट्रल सिंधी पंचायत, नागपूर माहेश्वरी सभा, नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स, आर्य वैश्य समाज, अग्रवाल समाज, चितपावन ब्राह्मण संघ, अ.भा. ब्राह्मण महासंघ, वैश्य एकता परिषद, श्री अग्रसेन मंडल, विदर्भ कायस्थ समाज, साऊथ इंडियन असोसिएशन, नागपूर चेंबर ऑफ कॉमर्स लि., गुजराती समाज, सनातन धर्म युवक सभा, कॅथॉलिक असोसिएशन ऑफ नागपूर, एबीबीएम महिला आघाडी, जैन समाज, पंजाब सेवा समिती, वेद प्रचारिणी सभा, इंतेझामिया कमिटी मेहंदीबाग, स्थानकवासी जैन समाज, बोहरा मुस्लीम समाज, आर्य समाज दयानंद भवन, श्री अग्रसेन मंडळ, माहेश्वरी पंचायत, विदर्भ टॅक्सपेअर्स असोसिएशन, अ.भा. बहुउद्देशीय हिंदी भाषीय ब्राह्मण महासंघ, दिगंबर जैन परवार मंदिर ट्रस्ट, जैन राजनैतिक चेतना मंच, श्री दोसर वैश्य शैक्षणिक मंडळ, दिगंबर जैन महा समिती महाराष्ट्र, राष्ट्रीय जैन महिला जागृती मंच, पंजाबी ब्राह्मण असोसिएशन, पूजा सकहार सिंधी पंचायत, नॅशनल एचआरडी नेटवर्क नागपूर, ज्येष्ठ मित्र मंडळ, अयोध्यावासी वैश्य समाज, केशरवाणी वैश्य कल्याण समिती, खंडेलवाल समाज, स्नेही इंजिनिअर संस्था, श्री बिकानेरी माहेश्वरी पंचायत, साहू समाज, तेली समाज, राजस्थानी महिला मंडळ, पाटीदार समाज, सनातन धर्म महिला समिती.मोर्चात डॉक्टरांचा एकोपा‘सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन’ मोर्चातून शहरातील डॉक्टरांचा एकोपा दिसून आला. यशवंत स्टेडियम ते संविधान चौकापर्यंत हे डॉक्टर घोषणा देत मोर्चात सहभागी झाले होते. यात डॉ. सुशील मानधनिया, डॉ. चैतन्य शेंबेकर, डॉ. अविनाश वासे, डॉ. अर्चना कोठारी, डॉ. अविनाश जोशी, डॉ. राजेश अग्रवाल, डॉ. फिदवी, डॉ. राजेश अटल, डॉ. नंदू कोलवाडकर, डॉ. विजय उपाध्याय, डॉ. राजेंद्र चांडक, डॉ. विश्वास दशपुत्रे, डॉ. हरीश चांडक, डॉ. प्रदीप राजदेरकर, डॉ. आशुतोष आपटे, डॉ. मिलिंद नाईक, यांच्यासह शहरातील अनेक वरिष्ठ डॉक्टर सहभागी झाले होते.यांचा होता सहभागहेमंत गांधी, सुरेश जग्यासी, रवी मुंगलीवार, सतीश पेंढारी, अनुप मुखर्जी, कैलास जोगानी, रॉय जॉर्ज, उर्मिलादेवी अग्रवाल, प्रकाश मेहाडिया, राजेश काबरा, के.के. थॉमस, वृशाली शिलेदार, भानू राजगोपालन, प्रदीप जाजू, नीलेश राठी, आरती देशपांडे, दिनेश राठी, राजेश शहा, अभिजित अंबईकर, अजय गुप्ता, के. जगदीशन, दिलीप राठी, मिलन साहनी, महेश कुमार, दिनेश टावरी, मिलिंद केकरे, मीनाक्षी मिश्रा, प्रज्ञा गिजरे, लघुवेंदू शेखर, हबीब खान, आर.डी. सालोडकर, सुशील श्रीवास्तव, सुरेश बंग, मनिष तिबदिवल, विनोद फाफट, आनंद सक्सेना, महेश बूब, दिलीप व्यास, टी. एस. ओबेरॉय, महेश रथकंठीवार, दीपक सक्सेना, एन.एन. चांडक, संतोष ढोले, नरेंद्र गांधी, प्रज्ञा देशपांडे, हजेरीलाल अग्रवाल, मुन्ना महाजन, राजेश मुंधडा, विवेक हरकरे, अतुल रथकंटीवार, स्मिता हरकरे, श्रीकृष्ण बुटी, सचिन पोशेट्टीवार, अर्चना कोठारी, राजेंद्र कुळकर्णी, विवेक रानडे, हर्षद भिसीकर, रॉय थॉमस नवीन चांडक, नुरल अमीन, आशुतोष गोटे, सतीश पोशेट्टीवार, सचिन खांडेकर, मनीष बिडवई, गोपाल लद्दड, दिनेश भैय्या, बच्चू पांडे, नंदू घारे, ब्रिजेश सेगन, अलोक पांडे, गोपाल सहानी, नितीन गुप्ता, विवेक भालेराव, सुधीर कपुर, पुष्कर पोशेट्टीवार, अमित हेडा, उमेश देशपांडे, राहुल पांडे, अलोक उमरे, विनय राठी, मुकुंद मोहरकर, प्रद्युम्न सावजी, राज अनगानी, विजू उपाध्याय.
आरक्षणामुळे मेरिटवर अन्याय नको : ६२ संघटनांनी काढला मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2019 10:38 PM
आरक्षणाच्या नावावर सरकार राजकीय पोळी शेकत आहे. सरकारने ७८ टक्क्यावर आरक्षण नेऊन ठेवल्याने खुल्या वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात आले आहे. आरक्षणामुळे मेरिटवर अन्याय नको, अशी भूमिका घेऊन ‘सेव्ह मेरिट सेव्ह नेशन’ असा आवाज देत विविध जाती, धर्माच्या संघटनांनी ऐकत्र येऊन भव्य मोर्चा काढला. आरक्षणाचे समर्थन करणाऱ्या सरकारच्या धोरणाचा निषेध करीत ५० टक्क्यावर आरक्षण मंजूर नाही, असा सूर आळवला.
ठळक मुद्देमेरिट वाचविण्यासाठी सरसावल्या संघटना