शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
3
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
4
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
8
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
9
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
10
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
11
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
12
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
13
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
14
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
15
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
16
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
17
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
18
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
19
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
20
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!

बँकांच्या संपामुळे नागपुरात कोट्यवधींचे आर्थिक व्यवहार ठप्प 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 12:10 AM

युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्सच्या आवाहनार्थ नागपुरातील सर्व बँकांचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी ३० व ३१ मे रोजी पुकारलेल्या दोन दिवसीय संपाच्या पहिल्या दिवशी सर्व राष्ट्रीयीकृत बँकांचे कामकाज ठप्प होते. त्यामुळे कोट्यवधींचे क्लिअरिंग व अन्य आर्थिक व्यवहार झाले नाहीत. शिवाय पहिल्याच दिवशी बहुतांश एटीएम कोरडे होते. पहिल्या दिवशी संप यशस्वी झाल्याचा दावा असोसिएशनने केला आहे.

ठळक मुद्देपहिल्या दिवशी संप यशस्वी : बहुतांश एटीएम बंद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्सच्या आवाहनार्थ नागपुरातील सर्व बँकांचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी ३० व ३१ मे रोजी पुकारलेल्या दोन दिवसीय संपाच्या पहिल्या दिवशी सर्व राष्ट्रीयीकृत बँकांचे कामकाज ठप्प होते. त्यामुळे कोट्यवधींचे क्लिअरिंग व अन्य आर्थिक व्यवहार झाले नाहीत. शिवाय पहिल्याच दिवशी बहुतांश एटीएम कोरडे होते. पहिल्या दिवशी संप यशस्वी झाल्याचा दावा असोसिएशनने केला आहे.असोसिएशनचा दोन टक्के वेतनवाढीच्या प्रस्तावावर आक्रोश दिसून आला. दहाव्या वेतन करारानुसार १५ टक्के वेतनवाढ तसेच यूएफबीयूच्या चार्टर आॅफ डिमांडमध्ये २५ टक्के वेतनवाढीचा प्रस्ताव आहे. संपाच्या पहिल्या दिवशी सकाळी १० वाजता सर्व बँकांचे अधिकारी आणि कर्मचारी बँक आॅफ इंडियाच्या मुख्य शाखेसमोर एकत्रित झाले आणि नारेबाजी केली. त्यानंतर चार हजारांपेक्षा जास्त कर्मचारी मोर्चाद्वारे स्टेट बँक आॅफ इंडिया आणि रिझर्व्ह बँक चौकातून अलाहाबाद बँकेसमोर गोळा झाले. यावेळी असोसिएशनचे नेते अनंत कुळकर्णी, सुरेश बोभाटे, प्रदीप येळणे, जयवंत गुर्वे, एल.पी. नंदनवार, नितीन बारवणकर, प्रदीप चक्रवर्ती, वीरेंद्र गेडाम आणि सुरभी शर्मा यांनी मार्गदर्शन केले.संचालन सत्यशील रेवतकर यांनी तर स्वयंप्रकाश तिवारी यांनी आभार मानले. संपाच्या यशस्वीतेसाठी मिलिंद वासनिक, श्रीकृष्ण चेंडके, प्रभात काकाश, दर्शन नायडू, विजय ठाकूर, विद्या जोशी, चंदा साने, दिनेश मेश्राम, मनोहर अगस्ती, माधव पोफळी, अशोक अतकरे आणि प्रतिभा मसराम यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :bankबँकStrikeसंप