लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निळ्या रंगाची पाण्याची बॉटल आणि त्याला हिरव्या रंगाचे झाकण असा प्रकार पाहून दानापूर-सिकंदराबाद एक्स्प्रेसमधील प्रवासी संतप्त झाले. त्यांनी याविरुद्ध लेखी तक्रार केली. नागपुरात दुपारी २.५५ वाजता ही गाडी येताच या गाडीतील पाण्याच्या ८७६ बॉटल आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्या.नागपुरातील ३२ प्रवासी काशी विश्वानाथच्या दर्शनासाठी गेले होते. सोमवारी दर्शन आटोपून ते १२७९२ दानापूर-सिकंदराबाद एक्स्प्रेसच्या बी-३ कोचने परत येत होते. गाडी सुटल्यानंतर एका तासाने त्यांनी पेंट्रीकारच्या व्हेंडरला पाण्याची बॉटल मागितली. या गाडीतील प्रवासी अमर नागपाल, किशोर रंघवानी, राजेश केवलरामानी यांनी सांगितले की, त्यांना पुरविण्यात आलेल्या बॉटलचे रॅपर वेगळ्या कंपनीचे आणि झाकण वेगळ्या रंगाचे होते. झाकण सील केलेले नव्हते. रेल्वेत रेल नीर कंपनीशिवाय दुसऱ्या कंपन्यांचे पाणी विकत नसल्याचे अमर नागपाल यांना माहीत होते. यातील १२ प्रवासी पेंट्रीकारमध्ये गेल्यामुळे तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर पेंट्रीकार कर्मचाऱ्यांनी पाण्याच्या बॉटलचे काही बॉक्स गाडीखाली फेकले. पेंट्रीकारच्या प्रमुखाने प्रवाशांवरच चेन पुलिंगचा आरोप लावला. चेन पुलिंग झाल्यामुळे आरपीएफचे जवान पेंट्रीकारमध्ये पोहोचले. पेंट्रीकारच्या व्यवस्थापकाने तक्रार पुस्तिका देण्यास नकार दिला. गाडीतील टीटीईसुद्धा तक्रार पुस्तिका न देताच निघून गेले. अनेकदा मागणी केल्यानंतर प्रवाशांनी पेंट्रीकारमधून तक्रार पुस्तिका घेऊन तक्रार नोंदविली. तक्रारीची प्रतही प्रवाशांना देण्यात आली नाही. अखेर प्रवाशांनी मोबाईलमध्ये त्याचा फोटो घेतला. आरपीएफ जवानांनी बनावट कंपनीचे पाणी विक्री करीत असल्याकडे दुर्लक्ष करून प्रवाशांनाच चेन पुलिंगसाठी विचारणा करून वेळ वाया घालविला. प्रवाशांनी या बाबीची तक्रार इंडियन रेल्वे कॅटरींग अँड टुरिझम कार्पोरेशन (आयआरसीटीसी) कडे केली. नागपुरात आयआरसीटीसीच्या चमूने पेंट्रीकारमधून ८७६ पाण्याच्या बॉटल ताब्यात घेतल्या. प्रवाशांनी पाण्याच्या बॉटल दाखविल्या असता, कचऱ्यातून उचलून त्यात पाणी भरून विकण्यात येत असल्याचा भास झाला.बनावट कंपनीचे पाणी गंभीर बाबरेल्वेगाड्यात रेल नीर कंपनीचेच पाणी विकले जावे, असे रेल्वे बोर्डाचे निर्देश आहेत. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात बनावट कंपनीचे पाणी पेंट्रीकारमधून विकल्या जात असल्यामुळे यात बड्या अधिकाऱ्यांचा हात असण्याची शंका आहे. या पाण्यामुळे प्रवाशांच्या आरोग्यावर विपरीत परीणाम होऊ शकतो. या बॉटलचे झाकणही सिल नसल्यामुळे कचऱ्यात पडलेल्या बॉटल उचलून त्यात पाणी भरून विकण्यात येत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.
बनावट कंपनीचे पाणी पुरविल्यामुळे प्रवासी संतप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 12:41 AM
निळ्या रंगाची पाण्याची बॉटल आणि त्याला हिरव्या रंगाचे झाकण असा प्रकार पाहून दानापूर-सिकंदराबाद एक्स्प्रेसमधील प्रवासी संतप्त झाले. त्यांनी याविरुद्ध लेखी तक्रार केली. नागपुरात दुपारी २.५५ वाजता ही गाडी येताच या गाडीतील पाण्याच्या ८७६ बॉटल आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्या.
ठळक मुद्देनागपुरात ८७६ बॉटल घेतल्या ताब्यात : दानापूर-सिकंदराबाद एक्स्प्रेसमधील घटना