शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

Nitin Gadkari: "वाजपेयी-अडवाणींच्या परिश्रमामुळेच मोदींच्या नेतृत्त्वात देशात भाजपची सत्ता"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 4:19 PM

मी पहिल्यांदा पक्षाच्या कार्यक्रमासाठी बांद्रयाला गेलो होतो, तेव्हा आमच्या पक्षाची खराब हालत होती

नागपूर - काही दिवसांपूर्वीच भाजपची संसदीय समिती जाहीर झाली, त्यात पक्षाचे पहिल्या फळीतील नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना स्थान देण्यात आलं नाही. त्यानंतर गडकरींचे पंख छाटल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यावर अद्याप गडकरी यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण, एका कार्यक्रमात विकासकामांच्या दिरंगाईवर बोलताना नितीन गडकरी यांनी पक्षाला घरचा आहेर दिला होता. आता, नागपूरच्या रेशीमबागेत भाजपच्या एक कार्यक्रमाला संबोधित नितीन गडकरींनी अटबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या आठवणी जागवल्या. 

मी पहिल्यांदा पक्षाच्या कार्यक्रमासाठी बांद्रयाला गेलो होतो, तेव्हा आमच्या पक्षाची खराब हालत होती. अटलजी भाषणासाठी उभे राहिले होते, ते म्हणाले. मी पाहतोय समुद्रात सूर्य बुडत आहे, पण हा काळोख निघून जाईल. सूर्य पुन्हा उगवेल आणि कमळ नक्कीच उगवेल. त्यावेळी, अनेकांच्या मनात विश्वास निर्माण झाला आणि आज तो दिवस उगवला. अटलजी, अडवाणीजी, दिनदयाल उपाध्यायजी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी मोठं काम केलं. त्यामुळे, मोदींच्या नेतृत्वात आपली सत्ता आली, असे नितीन गडकरी यांनी म्हटलं. 

देशासह राज्यातही आपली सत्ता आली. तो राजकीय विषय आहे. पण, सामाजिक कार्यातूनही एक दिवस नक्कीच असा येईल. देशातून गरिबी, भूकमारी, बेरोजगारीपासून मुक्ती मिळेल. आपण, सुशिक्षित आणि सुसंस्कृत व्हाल. आपण देशातील आदर्श नागरिक बनला, देशातील सर्वच नागरिकांना तुमचा अभिमान वाटेल, तो दिवस आता दूर नाही, असेही गडकरी यांनी म्हटले.

सरकारला घरचा अहेर

दरम्यान, असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्सने आयोजित केलेल्या 'NATCON 2022’ कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले होते, ''बांधकाम क्षेत्रात वेळेला खूप महत्त्व आहे, वेळ हीच आपली खरी संपत्ती आहे. प्रोजेक्ट आखले जातात, पण ते वेळेत पूर्ण कसे होतील, याकडे लक्ष दिलं पाहिजे. मात्र, सरकारची सर्वात मोठी समस्या ही आहे, की सरकार वेळेवर निर्णय घेत नाही,'' असा घरचा आहेर गडकरी यांनी दिला.  

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपाnagpurनागपूरNarendra Modiनरेंद्र मोदी