नागपूर: नागपूर - गुमगाव मार्गावर सुरू असलेल्या ट्रॅक मेंटेनन्स वर्कमुळे अनेक रेल्वेगाड्यांची गती मंदावली. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी ६.३० नंतर अनेक रेल्वेगाड्या रेंगाळल्या. सूत्रांच्या माहितीनुसार, गुमगाव रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे ट्रॅकचे काम शुक्रवारी सायंकाळी सुरू करण्यात आले. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सायंकाळी ६.३० नंतर या मार्गाने धावणाऱ्या गाड्या काही अंतरावरच रोखण्यात आल्या.
दुरवर धावणाऱ्या गाड्यांना हळुवार चालण्याचा मेसेज देण्यात आला. परिणामी अनेक गाड्यांचा वेग मंदावला. अमरावती इंटरसिटी आणि हावडा पुणे एक्सप्रेस अजनी स्टेशनला थांबवून ठेवण्यात आली. जवळपास अर्धा तास होऊनही ट्रेन पुढे निघण्याचे नाव घेत नसल्याने प्रवाशांमध्ये कुजबुज सुरू झाली. त्यानंतर चाैकशी करणारांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली.
खाण्यापिण्याच्या स्टॉलवर गर्दीरेल्वे गाड्यांना विलंब होणार असल्याचे कळाल्याने अनेक प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर असलेल्या खाण्या-पिण्याच्या स्टॉलवर एकच गर्दी केली होती.