लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशाच्या मध्यभागी असतानाही व राज्याच्या उपराजधानीचा दर्जा असतानाही नागपुरातून मानवी अवयव पाठविण्यासाठी वेळेवर घरगुती विमान उपलब्ध होत नसल्याची उदाहरणे समोर आली आहेत. मंगळवारी विमान उपलब्ध न झाल्यामुळे ब्रेन डेड रुग्णाचे हृदय व फुफ्फुस दान देता आले नाही. यकृत नागपुरातील रुग्णाला दान देण्यात आले. २०१३ पासून आजवर नागपुरात ३३ ब्रेन डेड रुग्णांचे अवयव दान करून प्रत्यारोपण करण्यात आले. नागपुरातील हे चौथे यकृत प्रत्यारोपण होते.वर्धा जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यातील धनोडी बहादुरपूर येथील रहिवासी सुनील शंकरराव शेराम (३३) यांचे ३ जून रोजी भांडण झाले होते. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी येथे उपचारासाठी दाखल केल्यानंतर त्यांचे ‘ब्रेनहेमरेज’ झाल्याचे सांगण्यात आले व ४ जून रोजी त्यांना ब्रेनडेड घोषित करण्यात आले. त्यांच्या भावाने हृदय, फुफ्फूस, यकृत, किडनी व कार्निया दान देण्याची परवानगी दिली होती. यानंतर राज्य, विभाग व राष्ट्रीय आॅर्गन अॅण्ड टिशू ट्रान्सप्लांट आॅर्गनायझेशन(नोटो) यांनाही याची माहिती देण्यात आली. दरम्यान, चेन्नई येथे गरजू रुग्ण मिळाला. मात्र, विमान उपलब्ध नसल्यामुळे अवयव पाठविण्यात येऊ शकले नाहीत. यानंतर यकृत सावंगी येथून ‘ग्रीन कोरिडोर’ करून नागपुरातील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये आणून प्रत्यारोपण करण्यात आले. एक किडनी व कार्निया सावंगी रुग्णालयात तर दुसरी किडनी आॅरेंज सिटी इस्पितळाला देण्यात आली. झोनल ट्रान्सप्लांट कॉर्डिनेशन कमिटीच्या अध्यक्ष डॉ.विभावरी दाणी, उपाध्यक्ष डॉ.वीरेश गुप्ता,समन्वयक वीणा वाठोरे, हॉस्पिटलची चमू डॉ.चंद्रशेखर महाकाळकर, डॉ.संदीप इरटवार, डॉ.हेमंत देशपांडे, डॉ.अमोल सिंघम, डॉ.संजय कोलते,डॉ.अभिजित धाले, डॉ. मनीषे बलवानी, डॉ.अमोल बावने यांनी यात महत्त्वाची भूमिका बजावली. किडनी प्रत्यारोपण डॉ.संदीप देशमुख, डॉ.एस.जे.आचार्य, यकृत प्रत्यारोपण गौरव गुप्ता, डॉ.अनुराग श्रीमल, डॉ.अंजली पत्की,डॉ.सौरभ कामत, डॉ.दिनेश झिरपे आदींनी केले.
विमान न मिळाल्याने हरले हृदय !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 1:26 AM
देशाच्या मध्यभागी असतानाही व राज्याच्या उपराजधानीचा दर्जा असतानाही नागपुरातून मानवी अवयव पाठविण्यासाठी वेळेवर घरगुती विमान उपलब्ध होत नसल्याची उदाहरणे समोर आली आहेत. मंगळवारी विमान उपलब्ध न झाल्यामुळे ब्रेन डेड रुग्णाचे हृदय व फुफ्फुस दान देता आले नाही. यकृत नागपुरातील रुग्णाला दान देण्यात आले. २०१३ पासून आजवर नागपुरात ३३ ब्रेन डेड रुग्णांचे अवयव दान करून प्रत्यारोपण करण्यात आले. नागपुरातील हे चौथे यकृत प्रत्यारोपण होते.
ठळक मुद्देनागपुरात चौथे लिव्हर ट्रान्सप्लांट : चार जणांना जीवनदान