नागपूर : आषाढी एकादशीनिमित्त विठू नामाच्या गजरात नागपूर जिल्ह्यातील वारकरी दंग झाले होते. गावोगावी विठ्ठलाच्या दर्शनाला पायीवाऱ्या निघाल्या होत्या. पालखी, रिंगण, भजन कीर्तनाचे सोहळे गावोगावी रंगले होते. विठूरायाच्या दर्शनासाठी मंदिरांमध्ये रांगा लागल्या होत्या. विठूनामाच्या स्मरणात वारकरी रंगून गेले होते. शहरातील मंदिरांमध्येही विठ्ठल रुक्मिणीचा अभिषेक व पूजन करण्यात आले. तर नागपुरातील भाविक मंडळींनी प्रतिपंढरपूर असलेल्या धापेवाड्यातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती.
रामटेक येथील मैराळ वाड्यातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातून रथासह पालखी यात्रा काढण्यात आली. तीन मजली रथ सजविण्यात आला होता. भजन, कीर्तनातून विठूच्या हरिनामाचा जप करीत पालखी यात्रा शहरभर फिरली. पालखी यात्रेसाठी संयोजक चंद्रशेखर भोयर, दिलीप बिसन, उदय भोगे, राजू बिसन, अमय बिसन, सुरेंद्र भोगे, राजू कोल्हे, आनंद जोशी आदींचे सहकार्य लाभले. मैराळ येथील विठ्ठल- रुक्मिणी मंदिर २०० वर्षांपूर्वीचे प्राचीन मंदिर आहे. आषाढी एकादशीला विठ्ठलाचे दर्शन घ्यायला विठ्ठल भक्त गर्दी करतात.
- एमआयडीसी परिसरात विठूनामाचा गजर
डिंगडोह येथील माउली ग्रुपतर्फे एमआयडीसी परिसरात विठ्ठलाची पालखी शोभा यात्रा काढण्यात आली. साई मंदिरातून या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. माउली ग्रुपचे बाळासाहेब वाघमारे, सुरेश काळबांडे, इंद्रायणी काळबांडे, किशोर पाटील, राकेश ऊमाळे,विष्णू बानाईत,सुरेश राजवाडे, बबन ठाकरे ,काशिनाथ मापारी, मोरेश्वर गायकवाड, सोपान तायडे, लक्ष्मण रडके, बंटी भांगे, बाळू दोडे, अनंतकुमार नाकट, अभय राॅय, विजय सराड, सुनील बंड, राजेश नारखेडे,सगने यांच्यासह दीपक सायखेडे, सोनु तिवारी, अमित गाडे, राजेश कुंभलकर, नंदू कावरे, हेमंत ऊकंडे, सोनु दुबे, प्रदीप बोरकर,अतुल कळसकर, दया मिश्रा, सतीश काळे, विठ्ठल वघाडे, जितू यादव, दिनेश खेवले, डॉ. सचिन तायवाडे, गौरव भंडारकर, प्रदीप बोरकर यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते.
- टाकळघाट येथे विठ्ठल नामाचा गजर
टाकळघाट येथील कृष्णा नदीच्या तीरावर वसलेल्या विठ्ठल रुक्मिणी देवस्थानात पंढरपूर एकादशी निमित्त भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सकाळपासून मंदिरामध्ये भजन, कीर्तन सुरू होते. भाविकांसाठी मंदिर परिसरात प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. गावातील मुख्य मार्गानी मिरवणूक काढण्यात आली.
- काटोल ते इसापूर पायीवारी
आषाढी एकादशीनिमित्त काटोल ते इसापूरपर्यंत पायीवारी दिंडी काढण्यात आली. दिंडीतील रथात आणलेल्या विठ्ठलाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा प्रकाश घोडे यांच्या शेतातील मंदिरात करण्यात आली. यावेळी नक्ष वानखेडे याने विठ्ठलाचे व दिव्यांशी काळे हिने रुक्मिणीचे रूप साकारले होते. आयोजनात पंकज घोडे, नीलिमा घोडे, सई घोडे, पुष्पलता बेले, सिंधू धवड, शालिनी काळे, छाया गोरडे, गीता फुके, ज्योती दराडे, सुमन भोंगे, ललिता कडू, चंद्रकला खंते, मंदा वैद्य, लीला निंबुळकर, मनोहर चव्हाण आदींचे सहकार्य लाभले.
हरिहर मंदिरात हरिनामाचा जप
भंडारा रोडवरील हरिहर मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल रुक्मिणीचा अभिषेक करण्यात आला. दिवसभर भजन व कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती. आयोजनात अध्यक्ष अर्जुनराव वैरागडे, पुंडलिक बोलधन, राजू उमाठे, गुलाब बालकोटे, भूषण क्षीरसागर, रामेश्वर हिरुडकर, अंबादास गजापुरे, मोरेश्वर घाटोळे, गोपाल कळमकर, उमेश नंदनकर, सुरेश बालकोटे, कमलाकर घाटोळे, रामदास गजापुरे, सुरेश बारई आदींचे सहकार्य लाभले.