शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

दहा कंत्राटदारांना दणका

By admin | Published: November 06, 2016 2:04 AM

शहरातील उखडलेल्या रस्त्यांच्या चौकशीत १८ रस्त्यांची कामे निकृष्ट झाल्याचे आढळून आले आहे.

नागपूर : शहरातील उखडलेल्या रस्त्यांच्या चौकशीत १८ रस्त्यांची कामे निकृष्ट झाल्याचे आढळून आले आहे. यातील दोषी १० कंत्राटदारांना वर्ग -१(अ) मधून वर्ग -१(ब) मध्ये पदावनत करण्यात यावे. तसेच दायित्व कालावधीतील उखडलेल्या रस्त्यांची दुरुस्ती दोन महिन्यात न केल्यास संबंधित कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश स्थायी समितीचे अध्यक्ष बंडू राऊ त यांनी शनिवारी स्थायी समितीच्या बैठकीत दिले. लोकमतने ‘लोकमत जागर’च्या माध्यमातून या विषयावर पालिका प्रशासनाचे वेळोवेळी लक्ष वेधले होते, हे विशेष.१८ रस्त्यांपैकी कंत्राटदार मे. ओ.जी. बजाज यांचे आठ रस्ते असल्याने त्यांना एकट्यालाच पदावनत करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशसानाने स्थायी समितीकडे पाठविला होता. परंतु उर्वरित १० रस्त्यांची कामे निकृष्ट असल्याने सर्व दोषी कंत्राटदारांवर कारवाई करण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे. पदावनत करण्यात येणाऱ्या कंत्राटदारात बजाज यांच्यासह मे. अमृत कन्स्ट्रक्शन, मे. प्रेमचंद राचूूमल, मे.आर.एम.गोपलानी, मे.पी.एम. ए. कन्स्ट्रक्शन,मे.अंकित कन्स्ट्रक्शन,मे.सेठ कन्स्ट्रक्शन, मे.फोनिक्स इंजिनिअरिंग, मे.एल.सी. गुरुबक्षानी आदींचा समावेश आहे. या सर्व कंत्राटदारांना तीन महिन्यासाठी पदावनत करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच जे कंत्राटदार वर्ग-१(अ)श्रेणीत नसतील त्यांना प्राप्त श्रेणीतून पदावनत क रण्याचा निर्णय घेण्यात आला. दायित्व कालावधी न संपलेल्या रस्त्यांची एक महिन्यात दुरुस्ती करावी. निर्धारित कालावधीत दुरुस्ती न केल्यास संबंधित कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश राऊ त यांनी दिले.नागपूर शहरातील सिमेंट रस्त्यांचे टप्पा-३ अंतर्गत सर्वेक्षण करून मंजुरीची प्रक्रिया सुरू आहे. स्थायी समितीने यापूर्वी ३९ रस्त्यांच्या सिमेंटीकरणाला मंजुरी दिलेली आहे. या रस्त्यांचे विधानसभा मतदार क्षेत्रनिहाय सहा पॅकेजेसमध्ये विभाजन करण्यात आले आहे. त्यानुसार उत्तर नागपूर सहा, मध्य नागपूर पाच, पूर्व नागपूर पाच, पश्चिम व दक्षिण नागपूर प्रत्येकी सात व दक्षिण-पश्चिम क्षेत्रात नऊ रस्ते मंजूर आहेत. याला मंजुरी देण्यात आली. या कामावर २३६ कोटी ७० लाखांचा खर्च केला जाणार आहे. (प्रतिनिधी)