लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भांडेवाडी डम्पिंग यार्डमधील कचऱ्याला मागील आठवडाभरापासून लागलेली आग अद्यापही नियंत्रणात आलेली नाही. गेल्या गुरुवारी २२ मे रोजी रात्री उशिरा येथे आग लागली होती. या घटनेपासून अग्निशामक दलाची दोन वाहने यार्ड परिसरात तैनात आहेत. कचºयातून धूर निघताच जवान पाण्याचा शिडकावा करतात. काही वेळ आग विझल्यावर पुन्हा धूर निघणे सुरू होते. आठवडाभरापासून हा प्रकार सुरू असल्याने परिसरातील नागरिकांसह हे पथकही त्रस्त झाले आहे.गेल्या आठवड्यातील आगीनंतर पुन्हा २८ मे रोजी दुसऱ्यांदा सकाळी ११.३० वाजता कचºयातून आगीच्या ज्वाळा उठल्या. आग पसरताच डम्पिंग यार्डच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर धूर पसरला. या घटनेपासृून यार्डमध्ये चार वाहने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी राबत आहेत. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, उन्हाळ्याच्या दिवसात आगीच्या घटना वाढतात. त्यानंतर धूर पसरायला लागला की परिसरात असणाºया वस्त्यांमधील नागरिक त्रस्त होतात.हॉटेल,दाल मिल, डेकोरेशन गोदामही जळालेइतवारीमधील शहीद चौकत असलेलेवंदना साऊथ इंडियन हॉटेलला बुधवारी रात्री ११ वाजता शार्ट सर्किटमुळे आग लागली. यात फ्रिज, ओव्हन, वॉटर फिल्टर, ग्राईंडर मशीन व किचनमधील अन्य साहित्य जळाले. या घटनेमध्ये ५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जाते. गुरुवारी सकाळी ११ वाजता कळमना येथील भारतनगर परिसरात असलेल्या दाल मिलला आग लागली. तर दुपारी स्वावलंबीनगरच्याप्लॉट नं. २८४ वरील डेकोरेशन गोदामालाही आग लागली. यात तिरपाल, कपडे व अन्य सामान जळाल्याने ५० हजार रुपयांचे नुकसान झाले.
नागपूरच्या भांडेवाडीतील डम्पिंग यार्डला पुन्हा आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 10:01 PM