मुख्यालयाकडे अहवाल : हमसफर सप्ताहाचा समारोपनागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाच्या सीमेत फेरबदल करण्याचा प्रस्ताव असून, याचा अभ्यास करून अहवाल झोन मुख्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. परंतु नेमका काय अहवाल पाठविला, याची माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक अमित कुमार अग्रवाल यांनी देण्याचे टाळले. रेल्वे हमसफर सप्ताहाच्या समारोपानिमित्त संचार दिनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, स्थानिक खासदारांनी विभागाची सीमा बदलविण्याचा प्रस्ताव दिला आहे. यात बोरतलाव ते दुर्ग आऊटरपर्यंतचा भाग रायपूर विभागाला देण्याचे नमूद करण्यात आले आहे. यावर विभागाने मुख्यालयाला अहवाल पाठविला आहे. त्यांनी सांगितले की, कोळसा आणि मॅगनिज वाहतूक वाढल्यामुळे विभागाचे उत्पन्न वाढले आहे. माल वाहतुकीत १६.९ टक्के वाढ झाली आहे. जबलपूर-बालाघाट, छिंदवाडा-नागपूर मार्गाचे काम डिसेंबर २०१७ पर्यंत नॅरोगेजवरून ब्रॉडगेज करण्यात येईल. रेल्वेचे परिचालन व्यवस्थित करण्यासाठी गोंदिया-बल्लारशा विद्युतीकरणाचे काम, इतवारी, कामठीमध्ये विकास कामे करण्याला प्राधान्य देण्यात येईल. स्वच्छ रेल्वे स्थानक ठेवण्याकडे लक्ष पुरविण्यात येईल. यात जनसामान्यांचे सहकार्य अपेक्षित आहे. यात कॉर्पोरेट क्षेत्र, व्यापारी, सामाजिक संघटनांचा सहयोग घेण्यात येत आहे.(प्रतिनिधी)कळमना डबलिंगच्या कामास वेळनागपूर-कळमना डबलिंगच्या कामात व्यत्यय आणणाऱ्या १८७ झोपड्यांपैकी ११७ झोपड्या हटविण्यात आल्या आहेत. उर्वरित अतिक्रमण आगामी काही दिवसांत काढण्यात येईल. त्यामुळे हे काम पावसाळ्यापूर्वी शक्य नाही. त्यामुळे या कामाची किंमत वाढली असल्याचे त्यांनी सांगितले. महापालिका, वन विभागाच्या सहकार्याने वृक्षारोपणडीआरएम अग्रवाल यांनी सांगितले की, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे महानगरपालिकेसोबत करार करून इतवारी-नागपूरदरम्यान रेल्वेमार्गावर वृक्षारोपण करणार आहे. याशिवाय वन विभागासोबत करार करून कळमना येथे पाच हजार वृक्ष लावणार आहे. रेल्वे सप्ताहात ११०० वृक्ष लावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
दपूम रेल्वे नागपूर विभागाची सीमा बदलणार
By admin | Published: June 02, 2016 3:17 AM