लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेडिकल रोड, कुंदनलाल वाचनालयाजवळ नागद्वारला लागून देशी दारूचे दुकान पुन्हा सुरू करण्यात आल्यामुळे महिलांनी ‘दुर्गे’चे रूप धारण करीत याला विरोध केला. गुरुवारी सकाळी ९ वाजता दारू दुकान उघडल्याचे दिसताच परिसरातील महिलांनी एकत्र येत जोरदार विरोध केला. दुकान बंद करण्यासाठी आंदोलन केले. यावेळी दुकान मालकाने महिलांना दमदाटी केली. मात्र, त्याच्या धमकीला न घाबरता महिला दटून राहिल्या. दुकानात घुसून तोडफोड केली. महिलांनी हिंमत पाहून नागरिकांनीही त्यांना साथ दिली. नागरिकांनीही दारू दुकानावर दगडफेक केली.आंदोलनानंतर महिलांनी या दारू दुकानाला कुलूप ठोकले. मोठा तणाव निर्माण झाल्याचे कळताच इमामवाडा पोलीस घटनास्थळी पोहचले. मात्र, पोलिसांच्या आगमनानंतरही महिलांनी आंदोलन मागे घेतले नाही. रस्त्यावर येत निदर्शने केली. प्राप्त माहितीनुसार बुधवारी रात्री महिलांनी या दारूदुकानावर हल्लाबोल केला. दुकानात तोडफोड करून ते बंद करण्यास भाग पाडले. पोलिसात तक्रारही नोंदविली. सोबतच या दारू दुकानाची चावी पोलिसांकडे सोपविली होती. मात्र, गुरुवारी पुन्हा दुकान उघडल्यामुळे संतापलेल्या महिलांनी पोलिसांनाही घेराव घातला.यावेळी पोलिसांनी दारूचे दुकान उत्पादन शुल्क विभागाच्या मंजुरी व नियमानुसार सुरू असून ते बंद करता येणार नाही, असे सांगितले. दुकान उघडण्यास विरोध केला तर महिलांवरच गुन्हे दाखल होतील, असेही पोलिसांनी स्पष्ट केले. यामुळे महिलांनी पोलिसांवर रोष व्यक्त केला.उत्पादन शुल्क विभागाला बोलवाविरोध करणाºया महिलांचे नेतृत्व करणारे नगरसेवक विजय चुटेले म्हणाले, दारू दुकानामुळे परिसरातील सामाजिक वातावरण खराब होत आहे. या दारू दुकानाच्या शेजारी ग्रंथालय, मंदिर, नर्सरी, शाळा आहे. नागद्वार वस्ती लागूनच आहे. महिलांमध्येही रोष आहे. त्यामुळे दुकान उघडण्याचा प्रयत्न झाला तर असाच विरोध केला जाईल. उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाºयांनी येथे येऊन परिस्थितीची पाहणी करावी व दुकानाचा परवाना रद्द करावा, अशी मागणी त्यांनी केली.
दारूदुकानाविरोधात ‘दुर्गां’चा एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 1:09 AM
मेडिकल रोड, कुंदनलाल वाचनालयाजवळ नागद्वारला लागून देशी दारूचे दुकान पुन्हा सुरू करण्यात आल्यामुळे महिलांनी ‘दुर्गे’चे रूप धारण करीत याला विरोध केला.
ठळक मुद्देपुन्हा केले दुकान बंद : मेडिकल रोड नाग द्वार जवळ दगडफेक