नागपूर : लॉटरी व्यावसायिक राहुल आग्रेकर यांचे एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करून हत्या करणारा मुख्य आरोपी दुर्गेश बोकडेने आत्महत्या केली. रायपूर (छत्तीसगड) मध्ये पोलीस त्याचा शोध घेत असताना एका लॉजमध्ये गळफास लावलेला त्याचा मृतदेह आढळला.सुरेश आग्रेकर हे विदर्भातील मोठे लॉटरी व्यावसायिक आहेत. त्यांचा मुलगा राहुलचे २१ नोव्हेंबरला दुर्गेश बोकडे, पंकज हारोड यांनी अपहरण केले. बुटीबोरी जवळच्या शेतात त्याची हत्या केली. राहुलचा मोठा भाऊ जयेशला फोन करून १ कोटींची खंडणी मागितली. आग्रेकर यांनी गुन्हे शाखा आणि लकडगंज पोलीसांत त्याच्या अपहरणाची तक्रार नोंदवली. आरोपींचा पोलीस मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंडमध्ये शोध घेत होते. पंकज आणि दुर्गेश मंगळवारी हावडा स्थानकावर पोहचले. तेथे वाद झाल्यानंतर हे दोघे वेगळे झाले. दुर्गेश रायपूरला आला तर पंकज कोलकात्यात थांबला. पंकजच्या मुसक्या आवळल्यानतर पोलीस दुर्गेशच्या मागावर होते.लॉजमध्ये गळफासदुर्गेश बुधवारी रायपूरच्या गुप्ता गेस्ट हाऊसमध्ये खोली क्रमांक ४ मध्ये थांबला होता. पंकजला अटक केल्याचे वृत्त त्याला कळले होते. शुक्रवारी खोली साफ करणाºयाला त्याने पंख्याला गळफास लावल्याचे दिसले. त्याची ओळख पटवल्यानंतर नागपूर पोलीस आणि त्याच्या नातेवाईकांना माहिती दिली.
दुर्गेश बोकडेची आत्महत्या, अपहरण हत्याकांडातील आरोपी ,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 5:02 AM