लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर-सेवाग्राम दरम्यान थर्ड लाईनचे काम मंदगतीने सुरू आहे. महिनाभरापूर्वी सिंदी ते बोरखेडी-बुटीबोरी सेक्शनमध्ये रेल्वेगाडी चालविण्यात येईल, असे वाटत होते. आता गाडी सप्टेंबर महिन्यात धावण्याची शक्यता असून याच दरम्यान चौथ्या लाईनवर बुटीबोरी-बोरखेडी व सिंदीपर्यंत रेल्वेगाडी धावणार आहे. सुरक्षेला प्राधान्य देणाऱ्या रेल्वेचे नागपूर-सेवाग्राम सेक्शन क्षमतेपेक्षा दुप्पट गाड्यांचा भार उचलत आहे. दहा वर्षापासून येथे थर्डलाईनवर भर देण्यात येत आहे. २०१२-१३ च्या अर्थसंकल्पात २९७.८५ कोटींची तरतूद करून थर्डलाईनची घोषणा करण्यात आली. ७६.३ किलोमिटर लांबीच्या या नव्या रेल्वे लाईनसाठी २०१५ पासून काम सुरू करण्यात आले आहे.विशेष म्हणजे विभागातील वरिष्ठ अधिकारी या महत्त्वाच्या प्रकल्पाबाबत माहिती नसल्याचे सांगत आहेत. बुधवारी या प्रकल्पाबाबत विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयात समीक्षा बैठक आयोजित करण्यात आली होती. रेल्वेत नव्या लाईन व ब्रॉडगेज लाईन टाकण्याचे काम वेळेवर पूर्ण होताना दिसत नाही. जबाबदार अधिकारी याबाबत उत्तर देण्यास टाळाटाळ करीत आहेत. तर कामही झपाट्याने होत नसल्याचे दिसत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार थर्ड लाईनच्या कामासाठी निधीची कमतरता नाही. परंतु प्रशासकीय दिरंगाईमुळे या कामाला गती मिळू शकलेली नाही. उत्तर देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्यामुळे या कामाला गती का मिळाली नाही हे स्पष्ट होऊ शकले नाही. याबाबत विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार यांना विचारणा केली असता त्यांनी आपण प्रशिक्षणासाठी इटलीला गेल्याचा संदेश पाठविला.उर्वरित काम २०२०-२१ पर्यंतथर्ड लाईन व चौथ्या लाईनच्या कामात प्राथमिक टप्प्यात बुटीबोरी ते सिंदीपर्यंतचा भाग आहे. उर्वरित काम पुढील वित्तीय वर्ष २०२०-२१ मध्ये करण्यात येणार आहे. मंदगतीने सुरू असलेल्या या कामासाठी किती टप्पे ठरविण्यात आले आहेत, याचा खुलासा होऊ शकला नाही.
नागपूर-सेवाग्राम दरम्यान चार वर्षात २० किलोमीटरही झाली नाही थर्ड लाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 10:47 PM
नागपूर-सेवाग्राम दरम्यान थर्ड लाईनचे काम मंदगतीने सुरू आहे. महिनाभरापूर्वी सिंदी ते बोरखेडी-बुटीबोरी सेक्शनमध्ये रेल्वेगाडी चालविण्यात येईल, असे वाटत होते. आता गाडी सप्टेंबर महिन्यात धावण्याची शक्यता असून याच दरम्यान चौथ्या लाईनवर बुटीबोरी-बोरखेडी व सिंदीपर्यंत रेल्वेगाडी धावणार आहे. सुरक्षेला प्राधान्य देणाऱ्या रेल्वेचे नागपूर-सेवाग्राम सेक्शन क्षमतेपेक्षा दुप्पट गाड्यांचा भार उचलत आहे. दहा वर्षापासून येथे थर्डलाईनवर भर देण्यात येत आहे. २०१२-१३ च्या अर्थसंकल्पात २९७.८५ कोटींची तरतूद करून थर्डलाईनची घोषणा करण्यात आली. ७६.३ किलोमिटर लांबीच्या या नव्या रेल्वे लाईनसाठी २०१५ पासून काम सुरू करण्यात आले आहे.
ठळक मुद्देकाम थंडबस्त्यात : चौथ्या लाईनवर सप्टेंबरमध्ये गाडी धावण्याची शक्यता