शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

आठवड्यात सोन्यात १०० ची वाढ तर चांदी १२०० रुपयांनी घसरली

By मोरेश्वर मानापुरे | Published: June 30, 2024 6:12 PM

नागपूर : गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या घडामोडींचा परिणाम नागपुरातील सराफा बाजारात दिसून आला. सहा दिवसात सोने १०० रुपयांनी ...

नागपूर : गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या घडामोडींचा परिणाम नागपुरातील सराफा बाजारात दिसून आला. सहा दिवसात सोने १०० रुपयांनी वधारले. तर चांदीचे भाव तब्बल १२०० रुपयांनी उतरले. ग्राहक आवश्यकतेसाठीच सोन खरेदी करीत असल्याचे सराफांनी सांगितले. 

सोमवार, २४ रोजी बाजार बंद होतेवेळी दहा ग्रॅम शुद्ध सोन्याचे दर ७१,९०० आणि चांदीचे भाव ८९,३०० रुपयांवर स्थिरावले. या शनिवार, २२ जूनच्या तुलनेत भावात अनुक्रमे १०० आणि ३०० रुपयांची वाढ झाली. मंगळवार, २५ रोजी सोने १०० रुपये आणि चांदीत ४०० रुपयांची घसरण झाली. बुधवार, २६ जूनला सोने २०० रुपये आणि चांदीचे भाव तब्बल १८०० रुपयांनी उतरले. मात्र, बुधवारच्या तुलनेत गुरुवारी सोने ५०० रुपये आणि चांदीत १२०० रुपयांची वाढ झाली. शुक्रवारी सोने आणि चांदीचे भाव अनुक्रमे १०० आणि ६०० रुपयांची वाढले.

मात्र, शनिवारी सोन्याचे भाव स्थिर होते, परंतु चांदीत ८०० रुपयांची घसरण झाली. या घडामोडीनुसार नागपुरात गेल्या आठवड्यात सोने १०० रुपयांनी वाढले तर चांदीचे भाव १२०० रुपयांनी उतरले. शनिवारी सोने ७२ हजार आणि चांदीचे भाव ८८,१०० रुपयांवर पोहोचले. या दरावर सराफांकडून ३ टक्के जीएसटी आकारला जातो. यानुसार सराफांकडे दहा ग्रॅम शुद्ध (२४ कॅरेट) सोने ७४,१६० आणि शुद्ध चांदीचे भाव ९०,७४३ रुपये होते. 

टॅग्स :Goldसोनं