सीसीटीव्हीची तपासणी सुरू : सरकार, महिला आयोगाकडून गंभीर दखल नागपूर : येथील आमदार निवासात १७ वर्षीय मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या प्रकरणाने राज्यभर खळबळ उडवून दिली आहे. राज्य सरकार अन् महिला आयोगाने गंभीर दखल घेतल्यामुळे या प्रकरणाचे पुरावे गोळा करण्यासाठी शुक्रवार सकाळपासून पोलीस यंत्रणा कामी लागली असून, राज्य महिला आयोगातर्फेही या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी सुरू झाली आहे. लोकमतने या खळबळजनक प्रकरणाचे ठळकपणे वृत्त प्रकाशित केल्यानंतर अवघी यंत्रणाच आज सकाळपासून तपासकामी गुंतली. गिट्टीखदान पोलीस ठाण्यात सकाळीच वरिष्ठ अधिकारी पोहचले. त्यांनी ठाण्यातील अधिकाऱ्यासोबत चर्चा केल्यानंतर तपासाबाबत दिशानिर्देश दिले. यानंतर गिट्टीखदानचा पोलीस ताफा आमदार निवासात पोहचला. तेथून सीसीटीव्हीचा डीव्हीआर (डिजीटल व्हीडीओ रेकॉर्डर) जप्त केला. त्यातून १४ एप्रिलच्या सकाळी आमदार निवासात पोहचलेले आरोपी आणि युवतीच्या १७ एप्रिलच्या सकाळपर्यंतच्या येण्याजाण्याचे सर्व चित्रण पोलिसांनी तपासले. त्याआधारे एक अहवाल तयार करण्यात आला. तिकडे आमदार निवासात त्या दिवशी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचेही पोलिसांनी बयान नोंदविले. त्यानुसार, आरोपी भगतने आमदार निवासाचे कक्ष सेवक योगेश भुसारी यांच्या शिफारशीवरून रजत मद्रे आणि प्रेम शुक्ल या दोघासाठी ३२० क्रमांकाची खोली मिळवून घेतली. केवळ एक दिवस हे पाहुणे थांबतील, असे यावेळी सांगण्यात आले होते. त्यानुसार, कक्ष सेवक रामकृष्ण राऊत यांनी ती खोली आरोपींना उपलब्ध करून दिली. नियमानुसार त्यांच्याकडून एक हजार रुपये भाडेही घेण्यात आले. एक दिवसाच्या नावाखाली तब्बल तीन दिवस तीन रात्री आरोपींनी या रूमचा वापर केला. त्यानंतर १७ एप्रिलच्या सकाळी ते निघून गेले. या प्रकरणात पोलिसांनी प्रारंभीपासूनच बजावलेली भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. आमदार निवासासारख्या संवेदनशील ठिकाणी अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा घडला. तो उघड होऊन पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतरही तब्बल ४८ तास पोलिसांनी त्याची माहिती उघड करण्याचे टाळले. प्रकरणाचा बोभाटा झाल्यानंतर पोलीस ठाण्यातील वेगवेगळ्या जबाबदार अधिकाऱ्यांनी पत्रकारांना वेगवेगळी माहिती दिली. काहींनी मुलीला आग्रा येथे तर काहींनी भोपाळ येथे नेण्याच्या नावाखाली आरोपींनी तिच्या घरून परवानगी घेतली, असे सांगितले. एका अधिकाऱ्याने मुलीला कामठी रेल्वेस्थानकावर ताब्यात घेतल्याचे सांगितले तर दुसऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याने मुलीला काटोल रेल्वेस्थानकावर ताब्यात घेतल्याचे म्हटले. गिट्टीखदान ठाण्यातील काहींनी दुसऱ्या आरोपीचे नाव मद्रे तर काहींनी मगरे सांगितले. विशेष म्हणजे, पोलिसांची ही गोंधळलेली स्थिती गुरुवारी रात्रीपर्यंत कायम होती. पत्रकारच काय, पोलीस माहिती कक्षातील अधिकाऱ्यांनाही गिट्टीखदान ठाण्यातून गुरुवारी रात्री ९ पर्यंत अधिकृत माहिती मिळाली नव्हती. पोलिसांचा हा गोंधळ अन् गोपनियता कोणत्या कारणामुळे होती, ते कळायला मार्ग नाही. मात्र, ही गोपनियता अन् गोंधळ पोलिसांच्या अंगलट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. युवतीच्या घरी महिला आयोग आमदार निवासासोबतच आरोपी भगतने फुटाळा, सेमिनरी हिल परिसरातही सैरसपाटा केल्याचे पुढे आले आहे. आमदार निवासाच्या खोलीचा गैरवापर केल्यानंतर आरोपींनी १७ एप्रिलच्या सकाळी चौथ्या दिवशी परत जाताना रूमची चावीही कक्ष सेवकाला परत केली नाही. दरम्यान, या प्रकरणाची माहिती तसेच आतापर्यंतच्या तपासाचा संपूर्ण अहवाल गृहमंत्रालयातून पोलिसांना मागण्यात आल्याची माहिती आहे. दुसरीकडे राज्य महिला आयोगाच्या सदस्या निता ठाकरे यांनीही या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी केली. त्यांनी गिट्टीखदान ठाण्यात जाऊन तपास अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची माहिती घेतली. त्यानंतर पीडित युवतीच्या घरी जाऊन तिच्यासोबत आणि पालकांसोबत चर्चा केली. यावेळी त्यांनी पीडित कुुटुंबीयांना दिलासा देत महिला आयोग तुमच्या पाठीशी आहे, अशी ग्वाहीसुद्धा दिली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा महिला बालविकास अधिकारी परदेशी आणि बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण हेसुद्धा होते. त्यानंतर ठाकरे यांनी पोलीस आयुक्तांसोबत या प्रकरणाबाबत चर्चा केली. पोलिसांच्या तपासात आणखी दोन नावे या प्रकरणाशी जुळलेली आणखी दोन नवीन नावे पोलिसांच्या तपासात पुढे आली. एका नाव कथित प्रेम शुक्लाचे आहे. त्याची या प्रकरणात काय भूमिका आहे, त्याची चौकशी सुरू आहे. दुसरे नाव युवतीच्या मैत्रिणीचे आहे. घरी येऊन आईवडिलांसमोर भगतने ती चार दिवस गायब होती, असा खुलासा केल्याने युवती घाबरली. तिने रजतला फोन केला. त्यानंतर रजत आणि एका मैत्रिणीने तिला आगरा, जयपूर येथे जाण्यासाठी ट्रेनमध्ये बसवून दिले. त्याचवेळी इकडे पोलिसांनी रजतला ताब्यात घेतले होते. त्याने युवती ट्रेनने आताच बाहेरगावी जात असल्याचे पोलिसांना सांगितले. परिणामी पोलिसांनी युवतीला काटोल रेल्वेस्थानकावरच ताब्यात घेतले. कक्ष सेवकाची बदली या प्रकरणाचा बोभाटा झाल्यानंतर आमदार निवासाच्या देखरेखीची जबाबदारी असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागातही खळबळ उडाली. त्यांनी आपले घोंगडे झटकण्यासाठी सारवासारव सुरू केली. कक्ष सेवक राऊत यांची रविभवनात बदली करण्यात आली. ही खोली देण्याची शिफारस करणाऱ्या योगेश भुसारीविरुद्ध काय
आमदार निवासाचा डीव्हीआर जप्त
By admin | Published: April 22, 2017 2:59 AM