कृष्णा कांबळे, पटेल यांचाही समावेश : विद्यापीठाचा स्थापना दिन ४ लानागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ९१ व्या स्थापना दिनानिमित्त सोमवारी ४ आॅगस्ट रोजी सकाळी १० वाजता विशेष समारंभ आयोजित करण्यात आला आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कोलकाता उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश जे.एन. पटेल तर अध्यक्षस्थानी प्रभारी कुलगुरू अनुपकुमार उपस्थित राहणार आहेत. विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात आयोजित कार्यक्रमात ‘लोकमत’च्या नागपूर आवृत्तीचे संपादक प्रा. सुरेश व्दादशीवार, प्रसिद्ध नाटककार प्रा. महेश एलकुंचवार, डॉ. कृष्णा कांबळे आणि डॉ. थ्रिटी पटेल यांना ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवन साधना’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. विद्यापीठाकडून दरवर्षी आदर्श प्राचार्य, शिक्षक, अधिकारी व शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार दिले जातात. यंदा आदर्श प्राचार्य पुरस्कार पुंजाबाई पटेल शिक्षण महाविद्यालय गोंदियाचे प्राचार्य डॉ. केशव भांडारकर व कवी कुलगुरू कालिदास इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी अॅण्ड सायन्स रामटेकचे प्राचार्य डॉ. भास्कर पटेल यांना जाहीर झाले आहेत.आदर्श शिक्षक पुरस्कार विद्यापीठाचे भूविज्ञानशास्त्र विभागाचे डॉ. दीपक मालपे, डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रतिभा सिरिया व सेठ केसरीमल पोरवाल कॉलेज कामठीच्या डॉ. श्रीबाला देशपांडे यांना जाहीर झाले आहे. आदर्श अधिकारी पुरस्कारासाठी विद्यापीठाच्या अंकेक्षण विभागाचे सत्यदेव रामटेके व आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कारासाठी पंकज बाबरे व नबीरा महाविद्यालयाचे जावेद अहमद इरशाद यांची निवड करण्यात आली आहे..विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार राजीव गांधी कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगचे शंतून ठेंगडी व रामदेवबाबा कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगचा विद्यार्थी अर्चना दास यांना जाहीर झाला आहे. सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनीं म्हणून डॉ. आंबेडकर कॉलेजची गायत्री टेकाडे व हिस्लॉप कॉलेजची अवनिका गुप्ता यांची निवड झाली आहे. याशिवाय इतरही पुरस्कारांची घोषणा यावेळी करण्यात आली.पत्रकार परिषदेला कुलसचिव डॉ. अशोक गोमासे,डॉ. श्रीकांत कोमावार, डॉ. सिद्धार्थ काणे, उपकुलसचिव प्रशांत मोहिते व प्रदीप बिनीवाले उपस्थित होते. (प्रतिनिधी)
द्वादशीवार, एलकुंचवार यांना जीवन साधना पुरस्कार
By admin | Published: August 03, 2014 12:51 AM