लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोणत्याही पार्श्वगायकाचा प्रभाव नसलेला युनिक गायक म्हणून हिंदी चित्रपट संगीतात गायक उदित नारायण यांची ओळख आहे. जाड आणि भरदार आवाज असूनही हळुवार संथपणाचा गोडवा रसिकांना कायम श्रवणानंद देणारा आहे. म्हणूनच ८० च्या दशकानंतर सर्व आघाडीच्या नायकांना आपला स्वर दिलेल्या या गायकाने रसिकांना प्रभावित केले आहे. ‘ऐ मेरे हमसफर..., तुमसे मिलना बाते करना..., आये हो मेरी जिंदगी मे..., ताल से ताल मिला..., ऐ अजनबी तू भी कभी..., पहला नशा...’ अशा कितीतरी गीतांमधील गोडवा रसिकांना आनंद देणारा आहे. त्यांच्या गीतांची जादू नागपूरकर रसिकांनी पुन्हा एकदा अनुभवली.बॉलिट्यून म्युझिकल एन्टरटेनर्स आणि हार्मोनी इव्हेन्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हिट्स आॅफ उदित नारायण’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ‘व्हाईस आॅफ उदित नारायण’ म्हणून ओळखले जाणारे मयंक भोरकर व राजेश समर्थ यांची निर्मिती संकल्पना असलेल्या हा कार्यक्रम सुरेश भट सभागृह येथे नुकताच सादर करण्यात आला. अर्थातच उदित नारायण यांना मानवंदना देणाऱ्या या कार्यक्रमात मयंक भोरकर यांच्या स्वरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रसिकांना अक्षरश भारावून सोडले. उदित नारायण यांच्या आवाजाशी साधर्म्य असणाºया त्यांच्या स्वरांनी गाण्यात जीव ओतला. मयंक यांच्यासह स्वास्तिका ठाकरे यांनी ‘ओ पालनहारे...’ या गीताद्वारे कार्यक्रमाची सुरुवात केली. पुढे नारायण यांच्या सुरांची ही मैफिल उत्तरोत्तर रंगत गेली. ‘तु मेरे सामने..., ये बंधन तो प्यार का बंधन है..., अकेले है तो क्या गम है..., मै निकला गड्डी लेके..., ना जाने मेरे दिल को क्या..., टिप टिप बरसा पानी..., बिन तेरे सनम..., तु चिज बडी है मस्त मस्त..., मेहंदी लगा के रखना..., परदेसी परदेसी..., कहो ना प्यार है..., ऐसा देश है मेरा..., सुनो गौर से दुनिया वालो...’ या गीतांना रसिकांची दाद मिळाली. खास बॉलिवूडमधील खान तिकडीच्या चित्रपटांतील ‘तेरे नाम..., अकेले हम अकेले तुम..., कुछ कुछ होता है..., मुझे निंद ना आये..., दिल तो पागल है..., चांद छुपा बादल मे..., पापा कहते है बडा नाम करेगा...’ या गीतांना रसिकांचा वन्स मोअर मिळाला.यावेळी महेंद्र ढोले, परिमल वाराणशीवार, अमित हत्तीठेले, अक्षय हरले, श्रीकांत सूर्यवंशी, प्रसन्ना वानखेडे, रुग्वेद पांडे, राजेश धामणकर, राकेश वानखेडे, सुभाष वानखेडे या वाद्यकलावंतांनी सुरेल साथसंगत केली. निवेदन श्वेता शेलगावकर यांचे होते.
ऐ अजनबी तू भी कभी आवाज दे कहीं से...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2018 11:51 PM
कोणत्याही पार्श्वगायकाचा प्रभाव नसलेला युनिक गायक म्हणून हिंदी चित्रपट संगीतात गायक उदित नारायण यांची ओळख आहे. जाड आणि भरदार आवाज असूनही हळुवार संथपणाचा गोडवा रसिकांना कायम श्रवणानंद देणारा आहे. म्हणूनच ८० च्या दशकानंतर सर्व आघाडीच्या नायकांना आपला स्वर दिलेल्या या गायकाने रसिकांना प्रभावित केले आहे. ‘ऐ मेरे हमसफर..., तुमसे मिलना बाते करना..., आये हो मेरी जिंदगी मे..., ताल से ताल मिला..., ऐ अजनबी तू भी कभी..., पहला नशा...’ अशा कितीतरी गीतांमधील गोडवा रसिकांना आनंद देणारा आहे. त्यांच्या गीतांची जादू नागपूरकर रसिकांनी पुन्हा एकदा अनुभवली.
ठळक मुद्देरसिकांनी अनुभवली उदित नारायण यांच्या गीतांची मोहिनी