राजीव सिंह।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भविष्यात इलेक्ट्रिक बस परिवहन सेवेचा एक महत्त्वाचा भाग ठरणार आहे. त्यामुळे आपली बसच्या ताफ्यात या बसेस सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू आहे. परंतु प्रत्यक्षात इलेक्ट्रिक बस संचालन डिझेल बसच्या तुलनेत स्वस्त ठरणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. या बसची किंमतच इतकी आहे की, या बसच्या एकूण किमतीच्या ६० टक्के रकमेत डिझेल बसची खरेदी व दहा वर्षे संचालन शक्य असल्याने इलेक्ट्रिक बससेवा महागच ठरणार आहे.रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत रामगिरीवर आयोजित बैठकीत यावर चर्चा करण्यात आली. वास्तविक बैठकीच्या अजेंड्यात बससेवेच्या मुद्याचा समावेश नव्हता. सूत्रांच्या माहितीनुसार ओलेक्ट्रा ग्रीन टेक लिमिटेड यांच्याकडून वेळेवर इलेक्ट्रिक बसचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. कंपनीने ग्रीन बसच्या धर्तीवर इलेक्ट्रिक बसला प्रति किलोमीटर ८७ रुपये दराने बिल देण्याचा प्रस्ताव मांडला. मात्र मुख्यमंत्र्यांनी कंपनीला २७ रुपये प्रति किलोमीटर दराने बससेवा सुरू करण्यास सांगतिले. इलेक्ट्रिक बस संचालनाला तत्त्वत: मंजुरी देण्यात आली आहे. मात्र कोणत्याही स्वरुपाच्या दस्तऐवजावर स्वाक्षरी करण्यात आलेली नाही. फक्त इलेक्ट्रिक बस चालविण्यावर चर्चा करण्यात आली.परिवहन विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इलेक्ट्रिक बससेवा स्वस्त नाही. चांगल्या कंपनीच्या इलेक्ट्रिक बसची किंमत २.३६ कोटी आहे. ग्रीन बसचा विचार करता ती १.२८ कोटीची तर स्टँडर्ड रेड बस ४५ लाखांची आहे. अशा परिस्थितीत इलेक्ट्रिक बस चालविणे सोपी बाब राहिलेली नाही. भारतात इलेक्ट्रिक बसची निर्मिती झाली तर भविष्यात या बसच्या किमती घटणार आहे. त्यानंतरच ही सेवा सोयीची ठरणार आहे.‘चार्जिंग’चा खर्च कमी असूनही सेवा महागइलेक्ट्रिक बस दिवसभर चालवावयाची असेल तर तिला तीन ते साडेतीन तास चार्जिंग करावे लागेल. यावर २० युनिट वीज खर्च होईल. व्यावसायिक दराचा विचार करत प्रति युनिट १६ रुपये प्रमाणे ३२० रुपये खर्च येईल. यात अनुदान मिळाले तर ५ रुपये दरानुसार वीज मिळू शकेल. अशा परिस्थितीत ८० रुपये खर्च येईल. इलेक्ट्रिक बसचे आयुष्य १० वर्ष आहे. अशा परिस्थितीत २.३६ कोटी भांडवली गुंतवणूक वसूल करण्यासाठी कंपनीला कसरत करावी लागेल. चार्जिंग, देखभाल व संचालन याचा खर्च विचारात घेता ही रक्कम मोठी होईल.
-तर डिझेल बससेवा स्वस्ततोटा असूनही डिझेल बससेवेचा परिवहन विभागावर फारसा आर्थिक भार नाही. १२ मीटरच्या डिझेल बसची किंमत ४५ लाख तर ९ मीटर बसची किंमत २५ लाख आहे. वर्षाला या बसवर ११ ते १२ लाखांचा डिझेल खर्च आहे. १० वर्षांत पूर्ण क्षमतेने बस चालविल्यास डिझेलवर १.२० क ोटी खर्च होतील. डिझेल खर्च व बसची किंमत याची बेरीज केली तरी एकूण खर्च १.६५ कोटी होईल. एका इलेक्ट्रिक बसच्या किमतीत दहा वर्ष डिझेल बस चालविणे शक्य आहे.
तेजस्विनीच्या संचालनातून स्पष्ट हाईल वास्तविकतातेजस्विनी योजनेंतर्गत महिलांसाठी पाच इलेक्ट्रिक बस चालविणे महापालिकेसाठी फायदेशीर ठरू शकते. यासाठी राज्य सरकारकडून ९.६० कोटी मंजूर झाले आहे. या बसेस खरेदी करण्यासाठी महापालिकेला खर्च करावा लागणार नाही. चार्जिगची किंमतही कमी आहे. अशा परिस्थितीत ही सेवा महापालिका स्वत: चालविणार असल्यास फायदेशीर ठरू शकते. तसेच या बसला प्रवाशांचा प्रतिसाद मिळतो की नाही, याची माहिती मिळेल. ग्रीन बसला प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याने ही सेवा अडचणीत आली आहे.