- सुमेध वाघमारेनागपूर : शाळांमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने ई-सिगारेटच्या आहारी जात असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. विशेष म्हणजे. शहरी भागातील विद्यार्थ्यांची संख्या आहे.एका लहानशा बॅटरीच्या मदतीने जळणाऱ्या सिगारेटला ई-सिगारेट किंवा इलेक्ट्रॉनिक सिगारेट म्हटले जाते. या सिगारेटमध्ये धूर होत नाही. फरक असा की, ई-सिगारेटमध्ये तंबाखू नव्हे तर थेट द्रवरूपातलं निकोटिन असते. ही सिगारेट पेटवण्यासाठी लाईटर किंवा आगपेटी लागत नाही. जेव्हा सिगारेट ओढण्याची कृती केली जाते तेव्हा या सिगारेटमधील द्रवरूप निकोटिनची वाफ तयार होऊन ती ओढली जाते. या वाफेला प्रत्यक्ष धुम्रपान केल्यासारखा वास नसतो. सिगारेट प्रत्यक्ष पेटवली जात नसल्यामुळे त्यापासून राखही तयार होत नाही. याचमुळे या सिगारेटकडे अनेक जण फारसे लक्ष देत नाही.पूर्व नागपुरातील एका मोठ्या खासगी शाळेत जेवणाच्या सुटीत एक विद्यार्थी वर्गात तोंड लपवून काही तरी ओढताना एका शिक्षकाला आढळून आला. त्याने लागलीच त्याची तपासणी केली असता ई-सिगारेट असल्याचे लक्षात आले. विद्यार्थ्याकडून चौकशी केली असता अनेक विद्यार्थी याचे सेवन करीत असल्याचे त्याने सांगितले. शिकवणी वर्गातील एका शिक्षकाने यात पुढाकार घेऊन सखोल चौकशी केल्यावर हा प्रकार उघड झाला. ‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले की, आठवी ते दहावीमधील विद्यार्थी या ‘ई-सिगारेट’च्या व्यसनात गुरफटत चालला आहे. जिज्ञासेपोटी, मित्रांच्या आग्रहामुळे एकाकडून दुसºयाला हे व्यसन लागत आहे.पानठेल्यामधून विद्यार्थ्यांना सहज विक्रीसुरुवातीला केवळ जिज्ञासेपोटी आस्वाद घेतला जातो आणि मग पुढे त्याची चटक लागते त्यानंतर ओढणारा आपोआप या विळख्यात सापडतो.
शालेय विद्यार्थ्यांना ई-सिगारेटचे व्यसन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2018 4:21 AM