शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी ‘ई-शिक्षा’; नागपूर विद्यापीठाचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 12:19 PM

ऐन परीक्षेच्या अगोदर अशी स्थिती उद्भवल्याने अभ्यासक्रम पूर्ण न झालेल्या विद्यार्थी व प्राध्यापकांमध्येदेखील चिंता आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व प्रत्येक विषयाचे धडे त्यांना मिळावे यासाठी नागपूर विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे.

 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी लॉकडाऊन लावण्यात आला असल्यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील सर्वच महाविद्यालयांत मागील महिनाभरापासून कुठलेही वर्ग झालेले नाहीत. ऐन परीक्षेच्या अगोदर अशी स्थिती उद्भवल्याने अभ्यासक्रम पूर्ण न झालेल्या विद्यार्थी व प्राध्यापकांमध्येदेखील चिंता आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व प्रत्येक विषयाचे धडे त्यांना मिळावे यासाठी नागपूर विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. ई-शिक्षा नावाचे विशेष पोर्टल सुरू करण्यात आले असून येथे त्यांना विद्यार्थ्यांसाठी लेक्चर्स, ऑनलाईन कन्टेंट घरूनच अपलोड करता येणार आहे.लॉकडाऊन लागू होताच सर्व संलग्नित महाविद्यालये व पदव्युत्तर विभागांना सुटी देण्यात आली. तसेच प्राध्यापकांनी घरूनच काम करावे, असे निर्देश विद्यापीठाकडून देण्यात आले. घरी असताना विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन कंटेंट तयार करण्यावर भर देण्याची सूचनादेखील प्रशासनाकडून करण्यात आली. काही खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांतील प्राध्यापकांनी घरूनच ऑनलाईन धडे देण्यास सुरुवात केली. शिवाय ऑनलाईन परीक्षादेखील घेण्यात आल्या. काही जणांनी लेक्चर्सचे व्हिडिओ व ऑडिओदेखील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविले. परंतु असा पुढाकार घेणाऱ्यांची संख्या मर्यादितच होती.परंतु इतरही अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन कंटेंटची मागणी होत होती. शिवाय विद्यापीठ अनुदान आयोगानेदेखील यासाठी विद्यापीठांनी विशेष प्रयत्न करावे असे दिशानिर्देश जारी केले होते. ही बाब लक्षात ठेवून नागपूर विद्यापीठाने ई-शिक्षा नावाचे विशेष पोर्टल विकसित केले. या पोर्टलवर प्राध्यापकांना घरुनच लेक्चर्सचे व्हिडिओ व ऑडिओ अपलोड करण्याची सुविधा देण्यात आली आहे.स्मार्टफोनवरदेखील होऊ शकतो अभ्यासई-शिक्षा पोर्टलवरील सर्व कंटेंट हा विद्यार्थ्यांना संगणक, लॅपटॉपवर पाहता येऊ शकतो. याशिवाय स्मार्टफोनवरच्या माध्यमातूनदेखील विद्यार्थी अभ्यास करू शकणार आहेत.

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र