शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
2
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
3
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
4
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
6
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
7
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
9
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
10
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
11
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
12
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
13
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
14
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
15
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
16
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
17
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
18
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
19
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
20
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो

अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठी ई-पासची सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 11:57 PM

लॉकडाऊनच्या काळात धान्य, भाजी, औषधे, किराणा, दूध, दुग्धजन्य पदार्थ, बियाणे, खत, शेतीची अवजारे यांच्या वाहतुकीसाठी आरटीओ कार्यालयाने ई-पासची व्यवस्था केली आहे. क्षेत्रीय वाहतूक कार्यालयाने यासाठी ‘ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन’या वेबसाईटवर अर्ज स्वीकारणे सुरू केले आहे.

ठळक मुद्देआरटीओने उघडली वेबसाईट : वाहतूकदारांना अंशत: दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनच्या काळात धान्य, भाजी, औषधे, किराणा, दूध, दुग्धजन्य पदार्थ, बियाणे, खत, शेतीची अवजारे यांच्या वाहतुकीसाठी आरटीओ कार्यालयाने ई-पासची व्यवस्था केली आहे. क्षेत्रीय वाहतूक कार्यालयाने यासाठी ‘ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन’या वेबसाईटवर अर्ज स्वीकारणे सुरू केले आहे.वेबसाईटवर ही नोंदणी करताना गुडस् व्हेईकल, एमएच ३१ ए, एमएच ४० या एमएच किंवा एमएच ४९ संबंधित कार्यालय सिलेक्ट करावे लागणार आहे. त्यानंतर वाहन मालक, चालकाचे नाव (लायसन्स नंबरसह), रजिस्टर्ड मोबाईल नंबर, दोघांचाही ई-मेल आयडी, वाहन क्रमांक, चेसिस क्रमांक (अखेरचे पाच आकडे), वाहनाचा प्रकार, वाहनातील माल, ई-पासचा कालावधी आदींचा उल्लेख करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेनंतर वर्ड व्हेरिफिकेशन कॅरेक्टर भरून अर्ज सबमिट करावा लागणार आहे. तो पास होण्यासाठी अप्लिकेशन रेफरन्स नंबर जनरेट होईल. ई-पास जनरेट झाल्यावर त्याला पीडीएफ स्वरूपात अर्जदाराच्या मेलवर पाठविता येईल. अर्जदार तो डाऊनलोड करून त्याचे प्रिंटआऊट काढू शकेल.वाहनांना मिळाली परवानगी२६ मार्च ते ११ एप्रिल या काळामध्ये नागपूर आरटीओ कार्यालयाकडून भाजीच्या वाहतुकीसाठी ७६, धान्यासाठी १४८, किराणा २१०, दूध व दुग्धजन्य पदार्थासाठी ३४,औषधांसाठी ६० तसेच बियाणे, खत व शेतीच्या अवजारांच्या वाहतुकीसाठी १५३ तसेच अन्य वस्तूंच्या वाहतुकीसाठी ९९ अशा एकूण ८३० वाहनांना परवानगी दिली आहे.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसnagpurनागपूर