शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
4
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
5
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
6
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
7
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
8
NTPC Green IPO Listing Today: एनटीपीसी ग्रीनचं निराशाजनक लिस्टिंग; मात्र नंतर स्टॉक सुस्साट, पहिल्याच दिवशी अपर सर्किट
9
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
10
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
11
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
12
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
13
Stock Market Highlights: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात, मिडकॅप इंडेक्समध्ये खरेदी; Adani Ports टॉप लूझर
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
15
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
16
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
17
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
18
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
19
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
20
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."

ऐसी लागी लगन, मीरा हो गई मगन...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 12:18 AM

काही व्यक्तींच्या जीवनाची ओळख अशी असते की जणू ईश्वराने नेमक्या त्याच कामासाठी त्यांना पृथ्वीवर पाठविले असावे असे वाटते. भजनसम्राट म्हणून नावलौकिक असलेले पं. अनुप जलोटा यांच्याबाबतीत असेच म्हणावे लागेल. ईश्वरानेच स्वर देऊन त्यांना भजन गाण्यासाठीच पाठविले की काय, असा भास व्हावा असा त्यांचा अंदाज. भावविभोर करणारा आवाज, कधी थांबत तर कधी लांब होणारे त्यांच्या सुरांचे आलाप आणि ऐकणाऱ्या  श्रोत्यांना थेट ईश्वरभक्तीत जोडणारा त्यांचा स्वर. त्यांच्या सुरांच्या जादूमुळे भक्तिरसात तल्लीन झाल्याचा अनुभव शनिवारीही नागपूरकरांना आला.

ठळक मुद्देजलोटा यांच्या भक्तिरसात श्रोते तल्लीन : साई पादुका आगमन सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काही व्यक्तींच्या जीवनाची ओळख अशी असते की जणू ईश्वराने नेमक्या त्याच कामासाठी त्यांना पृथ्वीवर पाठविले असावे असे वाटते. भजनसम्राट म्हणून नावलौकिक असलेले पं. अनुप जलोटा यांच्याबाबतीत असेच म्हणावे लागेल. ईश्वरानेच स्वर देऊन त्यांना भजन गाण्यासाठीच पाठविले की काय, असा भास व्हावा असा त्यांचा अंदाज. भावविभोर करणारा आवाज, कधी थांबत तर कधी लांब होणारे त्यांच्या सुरांचे आलाप आणि ऐकणाऱ्या  श्रोत्यांना थेट ईश्वरभक्तीत जोडणारा त्यांचा स्वर. त्यांच्या सुरांच्या जादूमुळे भक्तिरसात तल्लीन झाल्याचा अनुभव शनिवारीही नागपूरकरांना आला.श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी तसेच श्री सदगुरु  साई चॅरिटेबल ट्रस्ट, नागपूर, श्री साई समाधी शताब्दी महोत्सव समिती विदर्भ आणि साईभक्त साईसेवक परिवार विदर्भ यांच्या संयुक्त विद्यमाने साईबाबा चर्म चरण पादुका आगमन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. याअंतर्गत चिटणीस पार्कवर ‘गजर साईनामाचा’ हा तीन दिवसीय भक्तिमय सांस्कृतिक कार्यक्रम होत आहे. या महोत्सवात शनिवारी भजन गायक पद््मश्री पं. अनुप जलोटा यांनी आपल्या सादरीकरणाने रंग भरले. श्रोत्यांना बराच वेळ वाट पाहावी लागली. रात्री ८ वाजता त्यांचे आगमन झाले. त्यांनी येताच आधी साई पादुकांचे दर्शन घेतले व त्यानंतर मंच सांभाळला. आपल्या चिरपरिचित अंदाजात ‘है आँख वो जो शाम का दर्शन किया करे, है शीश जो प्रभुचरण मे वंदना किया करे...’ या शायरीने सुरुवात करीत त्यांनी ‘जय श्री वीर बाबा, जय श्री वीर साई...’ ने आलाप दिला. मात्र लगेच त्यांनी ‘ऐसी लागी लगन, मीरा हो गई मगन...’ गात श्रोत्यांना आपल्याशी जोडले. हे भजन म्हणजे अनुप जलोटा यांची ओळखच होय. त्यामुळे त्यांचे गाणे सुरू होताच श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना प्रतिसाद दिला. पुढे त्यांनी ‘बचपन के शिवम, कृष्ण दामोदरम, राम नारायणम...’ सादर केले. अनुप जलोटा यांच्या चित्रपट गायकीला ४० वर्षांपूर्वी ज्या ‘शिर्डी के साईबाबा’ चित्रपटातून सुरुवात झाली, त्यातील ‘साईनाथ तेरे हजारो हाथ...’ गायला सुरू करताच श्रोत्यांच्या भावनांना वाट मोकळी झाली व प्रत्येकजण त्यांच्यासोबत गाऊ लागले.भजनांची ही सुरेल मैफिलीचा उत्तरोत्तर रंग चढत गेला.अनुप जलोटा यांनी ‘राम नाम की लूट है, लूट सके तो लूट..., साईबाबा बोलो..., पायो जी मैने राम रतन धन पायो..., जहां जहां मै जाता साई, गीत तुम्हारे गाता..., इतना तु करना स्वामी, जब प्राण तनसे निकले...’ अशी एकाहून एक सरस भजने त्यांनी सादर केली. त्यांच्या गायनाची प्रत्येक शैली श्रोत्यांचा मनाचा ठाव घेणारी होती. त्यांना सहगायिका नीता शाजी अग्रवाल यांच्यासह तबल्यावर देवेंद्र भारती, गिटारव धीरेंद्र व व्हायोलिनवर एम. राशीद यांनी सुरेल साथसंगत केली. यादरम्यान पं. जलोटा यांची सरगम व राशीद यांच्या व्हायोलिनची जुगलबंदी श्रोत्यांना उत्साहित करून गेली.कार्यक्रमापूर्वी आयोजन समितीचे संयोजक पंकज महाजन यांनी अनुप जलोटा यांचे व इतर कलावंतांचे स्वागत केले. तत्पूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी साईपादुकांचे दर्शन घेतले. यासोबतच आमदार कृष्णा खोपडे, माजी खासदार दत्ता मेघे, वीरबजरंगी सेवा संस्थानचे अध्यक्ष श्रीकांत आगलावे, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, राजीव जयस्वाल, बंडू राऊत, साई चित्रकार सुनील शेगावकर उद्योजक प्रशांत शेंडे यांनी भेट दिली. आयोजनात प्रदीप साबळे, विवेक अवसरे, प्रमोद कोरमकर, राज कोरमकर, नरेंद्र धनविजय, पंकज झरबडे, मोहन चौहान, भूषण परसोडकर, आशिष चिरकुटे, अनुपम बल्की, अमोल बैस, अमित गोंडाणे, विजय भोयर, सचिन खवले, जिगनेश साबळे, भूपेन दाते, आशिष खिरेकर आदींचा सक्रिय सहभाग आहे.लाखो भाविकांनी घेतले दर्शनसाई पादुका आगमन सोहळा हा नागपूर व विदर्भातील साईभक्तांसाठी अविस्मरणीय क्षण ठरत आहे. २५ ला साईबाबांच्या चरण पादुकांचे आगमन झाले तेव्हापासून पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची गर्दी होत आहे. शनिवारी सकाळपासूनच भाविकांनी पादुका दर्शनासाठी चिटणीस पार्क वर रीघ लागली होती. साईनामाचा गजर करीत भाविक मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी पोहचत होते. ही गर्दी रात्री उशिरापर्यंत होती. दिवसभरात लाखो भाविकांनी साईपादुकांचे दर्शन घेतल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :saibabaसाईबाबाnagpurनागपूर