शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
2
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
3
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: नांदेड पोटनिवडणुकीत अखेर काँग्रेसचा विजय; रविंद्र चव्हाण यांचा १४५७ मतांनी विजय
4
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
5
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
6
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
7
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
8
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
9
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
10
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
11
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
12
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
13
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
14
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
15
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
18
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
19
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय

देशासाठी पदके मिळवली, आता विकताे चहा-पाेहे; छत्रपती पुरस्कारप्राप्त दिव्यांग खेळाडूची नोकरीसाठी वणवण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2023 7:23 AM

क्रीडा आयुक्तालयातून २०१८ मध्ये नोकरीसंदर्भात खेळाडूंची यादी प्रसिद्ध झाली. कागदपत्रांची पडताळणी झाली; पण पुढे त्यावर काहीच निर्णय झाला नाही.

- राजेश टिकले लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आंतरराष्ट्रीय पातळीवर धनुर्विद्येत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संदीप गवई या दिव्यांग खेळाडूला शासनाने उपेक्षित ठेवले आहे. शासकीय नोकरीसाठी धडपड करताना निराशा आल्याने कुटुंबाच्या पोषणासाठी अखेर त्याने चहा-पोह्यांची गाडी सुरू केली आहे.  

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या संदीपने चार आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. राष्ट्रीय  आणि राज्य स्तरांवर त्याने १८ मेडल पटकाविली आहेत. संदीप एका पायाने दिव्यांग आहे. या पदकांच्या भरोशावर शासकीय नोकरी मिळेल, अशी त्याला अपेक्षा होती; पण तीही फोल ठरली आहे. 

आश्वासन दिले, पण... 

क्रीडा आयुक्तालयातून २०१८ मध्ये नोकरीसंदर्भात खेळाडूंची यादी प्रसिद्ध झाली. कागदपत्रांची पडताळणी झाली; पण पुढे त्यावर काहीच निर्णय झाला नाही.  संदीपने नोकरी मिळावी म्हणून  मंत्रालयाच्या चकरा मारल्या. आमदार बच्चू कडू यांना भेटून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत कैफियत पोहोचविली. त्यांनीही दोन दिवसांत बैठक घेऊन तोडगा काढण्याचा निर्णय घेतला; पण ती बैठकच झाली नाही.

उपजीविकेसाठी नाइलाजाने चहा-पोह्यांची गाडी लावली आहे. त्यातून कुटुंबाची गुजराण करीत आहे. दु:ख याचे वाटतेय की, शासन दिव्यांगांच्या बाबतीत उदासीन आहे. नवे खेळाडू माझी व्यथा बघून खेळापासून परावृत्त होत आहेत.    - संदीप गवई, शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित