ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. १२ - पश्चिम महाराष्ट्राने विदर्भावर अन्याय केल्याची आरोड सातत्याने होत असून हा अन्याय पुराव्यानिशी समोर आणत वेगळया विदर्भाची मागणी पुन्हा एकदा जोर धरत असतानाच विदर्भातच पुर्व व पश्चिम अशा दोन विभागात विकासाबाबत कुरघोडीचे चित्र समोर आले आहे.
अखील भारतीय रोड काँग्रेसच्या निर्देशानुसार प्रत्येक राज्याचा व त्यामधील जिल्ह्याचा रस्ते विकास आराखडा तयार करून उद्दिष्ट ठरविले जाते या उद्दिष्टपूर्तीची माहिती घेतली असता पुर्व विदर्भात ७२ टक्के रस्ते झाले असून या तुलनेत पश्चिम विदर्भाचे उद्दीष्ट केवळ ६६ टक्क्यांवर थांबल्याचे चित्र समोर आले आहे.
अखील भारतीय रोड काँग्रेसच्या निर्देशानुसार तयार करण्यात आलेल्या रस्ते विकास आराखडयामध्ये राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग तसेच प्रमुख जिल्हा मार्गांचा समावेश असतो. या मार्गांच्या निर्मितीबाबत जिल्हानिहाय उद्दिष्ट ठरवितांना संबधीत जिहह्याचे क्षेत्रफळही गृहीत धरले जाते.
पुर्व विदर्भाचे क्षेत्रफळ हे ५१ हाजार ३७७ चौरस किलोमिटर असून पश्चिम विदर्भाचे क्षेत्रफळ हे ४३ हजार २७ किलोमिटर आहे. विदर्भाच्या क्षेत्रफळाचा विचार केला तर पुर्व विभागाचे क्षेत्रफळ हे एकूण क्षेत्रफळाच्या ५२ टक्के तर पश्चिम विदर्भाचे ४८ टक्के आहे केवळ चार टक्के क्षेत्रफळ जास्त असले तरी रस्ते विकासामध्ये पुर्व विदर्भाने मात केली आहे.
मार्च २०१५ च्या अहवाला नुसार पुर्व विदर्भात ५१ हजार ९०१ किलो मिटरचे रस्ते तयार करण्याचे उद्दीष्ट होते त्या पैकी ३७ हजार ३७८ किमीचे रस्ते तयार झाले आहेत. ही टक्केवारी उद्दीष्टाच्या ७२ टक्के आहे. तर पश्चिम विदर्भाचे उद्दीष्ट हे ४२ हजार ३३९ किलोमिटर रस्ते निर्मितीचे होते त्यापैकी २८ हजार २८६ किमी चे रस्ते तयार झाले आहेत. या उद्दीष्ट पुर्तीवरून पुर्व विदर्भाने पश्चिम विदर्भावर मात केल्याचे दिसत आहे.
उद्दीष्ट ठरवतांनाच चुक झाली !
पश्चिम विदर्भाचे भौगोलीक क्षेत्र विदर्भाच्या भौगोलीक क्षेत्राच्या ४७.२५ टक्के आहे त्यामुळे रस्ते विकासाचे उद्दीष्ट भौगोलीक क्षेत्राच्या टक्केवारीतच ठेवणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र हे उद्दिष्ट विदर्भाच्या रस्तांच्या उद्दिष्टाच्या ४४.९२ ठेवण्यात आले. या उलट पुर्व विदर्भाचे भौगोलीक क्षेत्र हे विदर्भाच्या क्षेत्रफळाच्या ५२.७५ टक्के आहे मात्र या विभागाच्या रस्ते विकासाचे उद्दीष्ट हे विदर्भाच्या रस्ते विकास उद्दिष्टाच्या ५५.०७ ठेवण्यात आले.
रस्ते विकासामध्ये पश्चिम विदर्भ माघारला आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी रस्ते विकासाचा मुद्दा अग्रक्रमाने हाती घेऊन निधी उपलब्ध करून दिला पाहिजे २०२१ पर्यंत पश्चिम विदर्भात अजून १४ हजार ५३ किमी रस्त्याचे काम बाकी आहे. जवळपास ५५ लाख रूपये प्रति किलोमिटर रस्त्याचा खर्च गृहीत धरल्यास पश्चीम विदर्भातील रस्ते विकासासाठी ७७२९.१५ कोटीचा निधी उपलब्ध होणे आवश्यक आहे.
-डॉ.संजय खडक्कार, माजी तज्ज्ञ सदस्य, विदर्भ वैधानिक विकास मंडळ नागपूर