लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पर्यावरणाचे संरक्षण करणे, प्रदूषण नियंत्रित करणे आणि वीज ग्राहकांचे पैसे वाचविणे या उद्देशाने महावितरणने सुरू केलेल्या पेपरलेस वीजबिल अर्थात ‘गो-ग्रीन’ संकल्पनेला ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. नागपूर परिक्षेत्रातील तब्बल ९ हजार २६४ ग्राहकांनी मासिक वीजबिलांसाठी कागदविरहीत ‘गो-ग्रीन’ चा पर्याय स्वीकारला आहे. या ग्राहकांना मासिक बिलात १० रुपये सुट दिल्या जात आहे.जे ग्राहक ‘गो-ग्रीन’ सुविधेचा पर्याय निवडतात अशा ग्राहकांना छापील देयकाऐवजी ऐवजी ई-मेल व एसएमएसद्वारे वीजबिल उपलब्ध करून दिले जात आहे. नागपूर जिल्ह्यातील तब्बल १ हजार ८९७, अमरावती जिल्ह्यातील १ हजार ३१८ ग्राहकांनी ‘गो ग्रीन’चा स्वीकार केला आहे. सोबतच बुलडाणा जिल्ह्यातील १ हजार २२२, अकोल्यातील १ हजार ६६, यवतमाळ जिल्ह्यातील ८३१, चंद्रपूर जिल्ह्यातील ७३५, गोंदियातील ४८६, भंडाऱ्यातील ४४९, गडचिरोलीतील ३७९ तर वाशीम जिल्ह्यातील ३६६ ग्राहकांनी ‘गो-ग्रीन’चा पर्याय स्वीकारला आहे. ‘गो-ग्रीन’चा पर्याय अधिकाधिक स्वीकारून ग्राहकांनी पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.
पर्यावरणपूरक ‘गो-ग्रीन’ला पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2019 1:38 PM
पर्यावरणाचे संरक्षण करणे, प्रदूषण नियंत्रित करणे आणि वीज ग्राहकांचे पैसे वाचविणे या उद्देशाने महावितरणने सुरू केलेल्या पेपरलेस वीजबिल अर्थात ‘गो-ग्रीन’ संकल्पनेला ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
ठळक मुद्देमासिक वीजबिलांसाठी शोधला कागदविरहीत पर्याय