शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

‘स्वच्छ भारत’साठी आता ‘इकोफ्रेंडली’ थूकदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 10:35 AM

जागोजागी थुंकणाऱ्या बहाद्दारांमुळे जंतूसंसर्ग होण्याचा धोका प्रचंड असतो. अशा व्यक्तींना डोळ्यासमोर ठेवून नागपुरातील बहिणभावाने एक अनोखे संशोधन केले व चक्क खिशात मावणारे ‘इकोफ्रेंडली थूकदान’च तयार केले आहे.

ठळक मुद्देबहीण-भावाची कमाल‘पिचकारी’बहाद्दरांना डोळ्यासमोर ठेवून संशोधन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकीकडे ‘स्वच्छ भारत’ मोहीम राबविण्यात येत असताना खर्रा, तंबाखू, पान खाऊन रस्त्यांवर ‘पिचकारी’ मारणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हा आपला जन्मसिद्ध अधिकारच आहे, अशीच अनेकांची मानसिकता असते. मात्र रस्ता असो, कार्यालय असो किंवा अगदी सार्वजनिक वाहतूकव्यवस्था, जागोजागी थुंकणाऱ्या अशा बहाद्दारांमुळे जंतूसंसर्ग होण्याचा धोका प्रचंड असतो. अशा व्यक्तींना डोळ्यासमोर ठेवून नागपुरातील बहिणभावाने एक अनोखे संशोधन केले व चक्क खिशात मावणारे ‘इकोफ्रेंडली थूकदान’च तयार केले आहे. रितू व प्रतीक मल्होत्रा असे या नवसंशोधकांचे नाव असून कमी वयात त्यांनी एक अनोखा आदर्शदेखील निर्माण केला आहे.वैद्यकीय तज्ज्ञांकडूनदेखील थुंकण्याचे प्रमाण वाढत असल्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. अनेक रोगांच्या जंतूंचा थुंकीवाटेच प्रसार होतो. थूकदान घेऊन फिरण्याचा तर धावपळीच्या युगात प्रश्नच येत नाही. मोठ्या प्रमाणात जनजागृती करूनदेखील थुंकण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. अशा स्थितीत आपण नेमके काय करू शकतो, या विचारातून मल्होत्रा भावंडांना ही संकल्पना सुचली. दोघांनीही अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले असून तांत्रिक अभ्यास व संशोधन करुन त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ‘इझिस्पीट’ नावाचे ‘इकोफ्रेंडली थूकदान’च तयार केले. अगदी सहजतेने खिशात मावेल अशा पद्धतीचे हे ‘पॅकेट’ असून त्यात विशिष्ट घटकांचा उपयोग करण्यात आला आहे. ज्यावेळी थुकायचे असेल तेव्हा हे ‘पॅकेट’ खिशातून काढायचे व थुकायचे इतकेच वापरणाऱ्याला करायचे आहे. यात विशिष्ट पद्धतीचे ‘अ‍ॅबसॉर्ब मटेरियल’ वापरण्यात आले आहे. यामुळे थुंकी या ‘मटेरियल’मध्ये शोषल्या जाते व काही वेळातच त्याचे रुपांतर ‘क्रिस्टल्स’मध्ये होते. त्यामुळे खिसा ओला होण्याचा किंवा ‘पॅकेट’मधून दुर्गंध येण्याची शक्यताच राहत नाही. एका ‘पॅकेट’मध्ये २५ वेळा थुंकता येते व त्याला यातील घटकांचे विघटन सहज शक्य आहे.

कुठलाही जंतूसंसर्ग नाहीरितू व प्रतीक मल्होत्रा यांनी खिशात मावू शकेल व कारमध्येदेखील वापरता येईल, असे ‘पॅेकेट’ व ‘कंटेनर’ स्वरूपातील ‘थूकदान’ तयार केले आहेत. थुंकी जमिनीवर पडल्यानंतर त्यातील तापमान वाढते व त्यानंतर त्यातून जंतूसंसर्गाचा धोका जास्त वाढतो. परंतु ‘इझिस्पिट’मध्ये वापरण्यात आलेल्या ‘अ‍ॅबसॉर्ब मटेरियल’मुळे तापमान वाढत नाही व त्यातील जंतू नष्ट होतात. विशेष म्हणजे यातून कुठलाही दुर्गंध येत नाही. ‘पॅकेट’ला ‘झिप’ असल्यामुळे थुंकी बाहेर ओघळण्याची कुठलीही शक्यता नाही. ‘कंटेनर’प्रमाणे आता ‘पॅकेट’देखील पेपरपासूनच तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रतीक मल्होत्रा याने दिली.

‘स्वच्छ भारत’ला मिळेल बळआम्ही याच्या ‘पेटंट’साठी अर्ज केला आहे. ‘स्वच्छ भारत’ मोहीम राबविण्यात येत असताना रस्त्यांवर बिनदिक्कतपणे थुंकणारे लोक पाहून आम्ही अस्वस्थ व्हायचो. यातूनच हे संशोधन साकारले. असे मत रितू मल्होत्रा हिने व्यक्त केले. दोघांनाही संशोधनामध्ये प्रतीक हरडे याचेदेखील मौलिक सहकार्य लाभले.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान