शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

नाना पटोलेंचे वकील ईडीच्या रडारवर; ॲड. सतीश उके यांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 10:15 AM

फडणवीसांच्या विरोधात खटला लढत असलेल्या उकेंच्या घरावर ईडीचा पहाटेच्या सुमारास छापा

ठळक मुद्देमोबाइल, लॅपटॉप जप्त : ६ तास कसून चौकशीजमीन अवैधरीत्या ताब्यात घेण्याचे प्रकरण

नागपूर:  अनेक काँग्रेस नेत्यांचे वकीलपत्र घेतलेले आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात कोर्टात खटला दाखल करणारे ॲड. सतीश उके यांच्या पार्वतीनगर येथील घरी गुरुवारी पहाटे ५ च्या सुमारास सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) पथकाने छापा टाकला. कारवाईदरम्यान सतीश उके आणि त्यांच्या कुटुंबीयांचे मोबाइल, लॅपटॉप ईडीने जप्त केले आणि कागदपत्रांची पाहणी केली. सहा तास कसून चौकशी केल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी ॲड. सतीश उके आणि त्यांचे भाऊ प्रदीप उके यांना अटक केली.

ॲड. सतीश उके विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि भाजप प्रदेश सरचिटणीस आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर सातत्याने आरोप करीत आहेत. न्यायमूर्ती लोया मृत्यूप्रकरणी ॲड. उकेंनी सनसनाटी आरोप करीत अनेक महत्त्वाचे दावे केले होते, आणि फडणवीस यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली होती. ॲड. सतीश उके हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील आहेत, हे विशेष. आजच्या कारवाईने नागपुरात राजकीय वातावरण तापले आहे.

काही आठवड्यांपूर्वी एका ६० वर्षीय महिलेने ॲड. सतीश उके यांच्यावर अनेक वर्षांपूर्वी धमकावून जमीन आपल्या नावावर केल्याचा आरोप करीत पोलिसांकडे तक्रार दिली होती. ॲड. सतीश उके नागपुरातील प्रेस क्लबमध्ये एका दुसऱ्या विषयावर पत्रपरिषद घेऊन बाहेर पडत असताना नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. अनेक तास चौकशी केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. मात्र ठोस कारवाई करण्यात आली नव्हती. ईडीने टाकलेला छापा हा त्याच अनुषंगाने असू शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली.

पुरावे नष्ट करण्यासाठी धाड टाकल्याचा आरोप

लॅपटॉपमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्धच्या केसेस, भविष्यातील केसेस आणि न्यायमूर्ती लोया मृत्यू प्रकरण, निमगडे खून प्रकरणाचे पुरावे होते. देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातील आमच्याकडे असलेले पुरावे नष्ट करण्यासाठीच ही धाड घातली असल्याचा आरोप प्रदीप उके यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केला.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस