लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पीएनबी घोटाळ्यात सहभागी असलेल्या गीतांजलीचे मालक मेहुल चोकसीच्या लातूर येथील शोरूमवरही प्रवर्तन निदेशालय (ईडी)च्या चमूने धाड टाकून दीड कोटींचे दागिने जप्त केले. तीन दिवसात ईडीच्या नागपूर शाखेतर्फे ही दुसरी कारवाई आहे.मेहुल चोकसीला सीबीआय व ईडी शोधत आहे. चोकसीचे गीतांजली ब्रांड नावाने देशातील अनेक शहरात शोरूम आहेत. ईडी देशभरातील गीतांजलीच्या शोरूमवर धाड टाकून चोकसीची संपत्ती जप्त करण्याच्या कामाला लागले आहे. यापूर्वी १९ फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथील शोरूमवर धाड टाकून दोन कोटींचे दागिने जप्त केले होते. यानंतर बुधवारी लातूर येथील शॉपर्स स्टॉपस्थित गीतांजली शोरूमवर धाड टाकून दीड कोटींचे दागिने जप्त केले.पीएनबी घोटाळा उघडकीस येताच ईडीच्या नागपूर शाखेने मेहुल चोकसीचा शोध सुरू केला आहे. सूत्रानुसार ईडीचे पाच अधिकाऱ्यांच्या एका टीमवर याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. चोकसीचे इतर शहरात पसरलेल्या नेटवर्कचाही ईडी शोध घेत आहे. ईडीच्या चमूने औरंगाबाद व लातूरमध्ये कारवाईदरम्यान शोरूमच्या कर्मचाऱ्यांचीही विचारपूस केली. त्यांच्याकडून चोकसीचे दुसरे उद्योग, गुंतवणूक व त्याची माहिती काढण्याचा प्रयत्न केला. परंतु कर्मचाऱ्यांनी मात्र त्यांना काहीही माहीत नसल्याचे सांगितले.
ईडीच्या नागपूर शाखेने लातूरमध्ये जप्त केले दीड कोटींचे दागिने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 12:22 AM
पीएनबी घोटाळ्यात सहभागी असलेल्या गीतांजलीचे मालक मेहुल चोकसीच्या लातूर येथील शोरूमवरही प्रवर्तन निदेशालय (ईडी)च्या चमूने धाड टाकून दीड कोटींचे दागिने जप्त केले. तीन दिवसात ईडीच्या नागपूर शाखेतर्फे ही दुसरी कारवाई आहे.
ठळक मुद्देपीएनबी घोटाळा : गीतांजली शोरूममध्ये ईडीची धाड