मोहपा : कनियाडोल (ता. कळमेश्वर) येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले. यात शिक्षकांनी काेराेना संक्रमण काळातील अनुभव कथन केले.
बेस्ट प्राक्टिसेस उपक्रमांर्तगत शिक्षिका ममता पाटील व साळवे यांनी त्यांच्या शाळेत राबविलेल्या विविध उपक्रमांचे सादरीकरण केले. सेतू अभ्यासक्रम, स्वरूप आणि रचना, मूल्यमापन या अंतर्गत सोनोली येथील शिक्षक अनंत गणोरकर व साधन समूह शिक्षक राहुल वानखेडे यांनी सविस्तर भूमिका मांडली व अनुभव सांगितले. विस्तार अधिकारी (शिक्षण) अंबादास गिरडकर यांचा यावेळी गाैरव करण्यात आला. परसोडी केंद्रप्रमुख दिलीप म्हसेकर यांनी शिकू आनंदे, शाळेबाहेरची शाळा, ऑनलाईन आणि ऑफलाईन शिक्षण मार्गदर्शन करीत विविध उपक्रमांची माहिती दिली. पिल्कापारचे मुख्याध्यापक विष्णू पोतले यांनी आभार मानले. परिषदेत परसोडी (वकील) केंद्रांतर्गत येणाऱ्या सर्व शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका सहभागी झाल्या हाेत्या.