शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

शिक्षण विभागाला पडला चाचा नेहरूंचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 10:25 AM

बालक दिनानिमित्त देशभरातील लहान मुलांकडून देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या प्रेरणेचा जागर करण्यात येईल. मात्र शिक्षण विभागाला बहुतेक चाचा नेहरू यांचा विसर पडला आहे.

ठळक मुद्देबालक दिन साजरा करण्याचे निर्देशच नाहीत

आशिष दुबे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बालक दिनानिमित्त देशभरातील लहान मुलांकडून देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या प्रेरणेचा जागर करण्यात येईल. मात्र शिक्षण विभागाला बहुतेक चाचा नेहरू यांचा विसर पडला आहे. विभागातर्फे शाळा-महाविद्यालयांना बालक दिन साजरा करण्यासंदर्भात कुठलेही दिशानिर्देश देण्यात आलेले नाहीत. विशेष म्हणजे महापुरुष किंवा महत्त्वाच्या व्यक्तींच्या जयंती साजरी करण्यासंदर्भात नियमितपणे दिशानिर्देश देण्यात येतात. हा प्रकार अनवधानाने झाला आहे की यामागे अन्य काही कारण आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार शिक्षण विभागाने शाळा-महाविद्यालयांसोबत विद्यापीठालादेखील कुठलेही निर्देश दिलेले नाहीत. त्यामुळेच शाळा, महाविद्यालयेच नाही तर सरकारी कार्यालयांमध्येदेखील कुठलीही तयारी दिसून आली नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठ व कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठात केवळ नेहरूंच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्याइतपतच कार्यक्रम मर्यादित असेल. माल्यार्पण कोणाच्या हस्ते करण्यात येईल याचादेखील उल्लेख करण्यात आलेला नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सामान्य प्रशासन विभागात लागलेल्या एका यादीनुसार पंडित नेहरू यांच्या प्रतिमेवर केवळ माल्यार्पण करण्यात येणार आहे. कुठल्याही महापुरुष किंवा महत्त्वाच्या व्यक्तीची जयंती किंवा पुण्यतिथीनिमित्त कशाप्रकारे कार्यक्रमांचे आयोजन करावे, याबाबत शिक्षण विभागातर्फे १० दिवसअगोदर सूचना जारी करण्यात येते. यानुसारच कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यासंदर्भात शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी ठोस उत्तर दिले नाही.

टॅग्स :children's dayबालदिन