नागपूर : मेंदूमधील विद्युत लहरींच्या हालचाली समजण्यासाठी ईईजी (इलेक्ट्रा ेएन्सेफॅलोग्रॅम) महत्त्वाचे असते. मेंदूच्या वेगवेगळ्या भागांत दुखापत झाली किंवा रक्तस्राव झाला, तर या लहरींचं रूप बदलतं. यावरून कुठल्या भागाला इजा झाली आहे याचं निदान करायला मदत होते. विशेषत: एपिलेप्सीचं निदान करण्यासाठी ईईजी हमखास वापरतात. असे असतानाही हे यंत्र गेल्या कित्येक वर्षांपासून बंद आहे. सूत्राच्या माहितीनुसार या लाखो रुपयाच्या मशीनवर सुरुवातीच्या काळात १०-१२ रुग्ण तपासण्यात आले. त्यानंतर ते आतापर्यंत ते बंदच आहे.-वॉर्ड २३ मध्ये ईएमजी, एनसीव्ही मशीन कुलपातऔषध वैद्यकशास्त्र विभागांतर्गत येणाऱ्या वॉर्ड क्र. २३ मध्ये ईएमजी (इलेक्ट्रोमायोग्राफ) व एनसीव्ही (नर्व्ह कंडक्शन व्हेलॉसिटी) या दोन्ही मशीन कुलपात बंद आहेत. गेल्या कित्येक महिन्यांपासून याचा वापरच झाला नसल्याचे सूत्राचे म्हणणे आहे. एनसीव्ही तपासणीत रुग्णाची ‘नर्व्ह डॅमेज’ आहे का किंवा त्यात काही गडबड असल्याची तपासणी होते. तर मसल्स डॅमेज झाल्यावर ईएमजी तपासणी करते. विशेष म्हणजे, या दोन्ही तपासणी करण्यासाठी साधारण दोन तास लागतात. तंत्रज्ञ नसल्याने व रुग्णांच्या गर्दीमुळे डॉक्टर नाईलाजने या दोन्ही तपासणीसाठी रुग्णांना बाहेर पाठवित असल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)
सायकॅट्रीक विभागातील ईईजी बंद
By admin | Published: September 05, 2015 3:10 AM