शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
2
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
3
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
4
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान
5
IPL Auction 2025: लिलावात बड्या खेळाडूंवर लागणार 'जम्बो' बोली... पाहा, कोणाकडे किती पैसे शिल्लक?
6
Amol Mitkari : "अजित पवारांप्रमाणे सुप्रिया सुळेंनी औदार्य दाखवावं, अमोल कोल्हेंनी..."; मिटकरींचं टीकास्त्र
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
8
'अदानी-मणिपूर प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी', काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीत मागणी
9
सरवणकर-अमित ठाकरे लढतीत महेश सावंत कशी बाजी मारून गेले? असं बदललं माहिमचं समीकरण
10
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
11
रोहित भाऊ ऑस्ट्रेलियात पोहचला; हिटमॅनची एन्ट्री टीम इंडियासह KL राहुलचं टेन्शन वाढणारी; कारण...
12
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
13
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
14
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
15
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
17
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
18
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
19
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
20
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!

पेशींच्या अभ्यासाने प्रभावी उपचार शक्य : विभा दत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2020 9:52 PM

पेशींचा अभ्यास केल्यास संबंधित रोगावर प्रभावी उपचार करणे शक्य होते. कर्करोग व क्षयरोगाच्या प्रकरणांमध्ये हे तंत्रज्ञान महत्त्वाचे ठरते, अशी माहिती एम्सच्या संचालक मेजर जनरल डॉ. विभा दत्ता यांनी दिली.

ठळक मुद्दे ‘एम्स’मध्ये राज्यस्तरीय ‘सायटोलॉजी’वर दोन दिवसीय परिषद

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : पेशींचा अभ्यास केल्यास संबंधित रोगावर प्रभावी उपचार करणे शक्य होते. कर्करोग व क्षयरोगाच्या प्रकरणांमध्ये हे तंत्रज्ञान महत्त्वाचे ठरते, अशी माहिती एम्सच्या संचालक मेजर जनरल डॉ. विभा दत्ता यांनी दिली. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्यावतीने (एम्स) राज्यस्तरीय ‘सायटोलॉजी’वर दोन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रपरिषदेत त्या बोलत होत्या.डॉ. दत्ता म्हणाल्या, मिहान परिसरातील ‘एम्स’मध्ये ८ व ९ फेब्रुवारी रोजी ही परिषद होईल. यात ३००हून अधिक पॅथालॉजिस्ट सहभागी होतील. पहिल्या दिवशी परिषदेचे उद्घाटन ‘वायने स्टेट युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसीन’ आणि अमेरिकेच्या डेट्रॉईट मेडिकल सेंटरचे प्रमुख डॉ. विनोद सीडम यांच्या हस्ते होईल. यावेळी त्यांच्या आई सुनंदा बी सीडम यांच्या स्मरणार्थ ‘सीएमई’ आयोजित केले जाईल. ज्यामध्ये अशा पेशी, ज्या कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचणे अवघड असते, यावर सायटोलॉजी तज्ज्ञ आपले अनुभव मांडतील. दुसरी कार्यशाळा ‘सर्व्हयाकल सायटोलॉजी’वर असेल. यात एएफएमसीचे डॉ. जसविंदर भाटिया मार्गदर्शन करतील. दुसऱ्या दिवशी ९ फेब्रुवारी रोजी परिषदेचे उद्घाटन खा. विकास महात्मे करतील. पॅथॉलॉजीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉ. शोभा ग्रोव्हरच्या सन्मानार्थ ही परिषद असेल. परिषदेच्या आयोजनासाठी डॉ. रसिका गडकरी, डॉ. निशा मेश्राम यांच्यासह डॉ. फातिमा कमल, डॉ किशोर देशपांडे, डॉ. मनजित कौर राजपूत हे परिश्रम घेत आहेत.

टॅग्स :AIIMS hospitalएम्स रुग्णालयnagpurनागपूरMediaमाध्यमे