लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबईमध्ये चित्रपटातील कलावंतांसाठी लागणारी वस्त्रे एहसानभाई चंदेरीतून नेत असत. एकदा अशाच एका थानात मी माझ्या कल्पकतेने बवलिलेला ‘अशरफी बुटी दुपट्टा’ टाकला होता. पुढे तोच दुपट्टा पाकिजा चित्रपटात मीनाकुमारी यांनी ‘ले लिन्हा दुपट्टा मेरा’ या गाण्यात घातल्याचे दिसले आणि मी उचकलोच... अशी भावना त्याच दुपट्टयावरील कलाकृतीसाठी राष्ट्रपती सन्मान मिळविणारे चंदेरी येथील अब्दुल हकीम ‘खलिफा’ यांनी व्यक्त केली.दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या परिसरात सुरू असलेल्या मृगनयनी मध्यप्रदेश प्रदर्शनात खलिफा सहभागी झाले असून, अशरफी बुटी साड्यासोबत आणल्या आहेत. अतिशय आकर्षक असणाऱ्या या साड्यांबाबत विचारणा केली असता, त्यांनी ही माहिती दिली. अशरफी बुटीची कलाकारी मी इजाद केल्यामुळेच मला या क्षेत्रातील उस्ताद म्हणून ‘खलिफा’ ही पदवी चंदेरीकरांनी दिल्याचा किस्साही त्यांनी सांगितला. ही कलाकारी साकारली तेव्हा मी केवळ १८ वर्षाचा होतो. पिढीजात कला असल्याने, नित्य नवे प्रयोग करणे हे आमचे नैमित्यिक काम. त्याच कारणाने मी अशरफी बुटी कलाकारी नव्या पद्धतीने साकारली. एहसान भाई चित्रपटांसाठी नेहमीच आमच्याकडून साड्या, दुपट्टे घेऊन जात असत. १९७०च्या काळात ते असेच कपडे घेऊन गेले असता, त्यांनी ‘तुझा दुपट्टा पाकिजा चित्रपटासाठी मीनाकुमारी घालणार’ असल्याचे सांगितले आणि मी जाम खुश झालो. १९७२ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि मी सगळ्यांचा खलिफा झाल्याचे ते म्हणाले. अतिशय पातळ आणि पारदर्शक असणाऱ्या वस्त्रावरील कलाकृती देखण्या असतात. त्यावरील कलाकृती उमटून दिसत असल्याने चंदेरी साड्यांची मागणी प्रचंड आहे. त्या दुपट्ट्यावर खलिफा यांनी २०० अशरफी चांदी व सोन्याच्या तारांनी साकारल्या होत्या. त्यासाठी २५ दिवस लागले होते. नंतर, अशरफी बुटी दुपट्टा आणि खलिफा हे गणितच बनल्याचे त्यांनी सांगितले. आमचा हा व्यवसाय संपूर्णपणे सरकारच्या अधिकारात चालतो आणि अधामधात राजेरजवाड्यातील श्रीमंत लोक आमच्याकडून ही वस्त्रे घेऊन जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
एहसान नें कर दिया एहसान... आणि दुपट्टा मीनाकुमारीने ओढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 9:30 PM
मुंबईमध्ये चित्रपटातील कलावंतांसाठी लागणारी वस्त्रे एहसानभाई चंदेरीतून नेत असत. एकदा अशाच एका थानात मी माझ्या कल्पकतेने बवलिलेला ‘अशरफी बुटी दुपट्टा’ टाकला होता. पुढे तोच दुपट्टा पाकिजा चित्रपटात मीनाकुमारी यांनी ‘ले लिन्हा दुपट्टा मेरा’ या गाण्यात घातल्याचे दिसले आणि मी उचकलोच... अशी भावना त्याच दुपट्टयावरील कलाकृतीसाठी राष्ट्रपती सन्मान मिळविणारे चंदेरी येथील अब्दुल हकीम ‘खलिफा’ यांनी व्यक्त केली.
ठळक मुद्दे‘अशरफी बुटी दुपट्टा’ साकारणारा कारागीर ‘खलिफा’ नागपुरातकलाकृतीसाठी राष्ट्रपती पुरस्काराने झाला होता सन्मान